बाबा सिद्दीकी हत्याकांडात पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाचे कनेक्शन; पोलिस तपासातून धक्कादायक खुलासा!
Baba Siddique Murder Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अटक करण्यात आरोपींच्या 15 आरोपींच्या जबाबातून आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे थेट पाकिस्तान अन् ऑस्ट्रेलियाचे कनेक्शन असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
15 आरोपींना आत्तापर्यंत अटक
बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये, गुलमेर सिंह, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणखर, हरिशकुमार निषाद, नितीन सापरे, राम कनोजिया, संभाजी पारधी, प्रदीप ठोंबरे, चेतन पारधी, भगवंत सिंह आणि अमित कुमार यांचा समावेश आहे. तसेच, फरार असलेल्या झीशान अख्तर, शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर यांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे.

पाकमधून ड्रोनद्वारे बंदूक पाठवली?
दरम्यान, सर्व आरोपींची चौकशी केली जात असून यामध्ये नवनवीन खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. बाबा सिद्दीकी प्रकरणातून पोलीस तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बंदूक व शस्त्रांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेलं फॉरेन मेड पिस्तुल हे पाकिस्तानी ड्रोनने पाठवंल होतं का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. कारण, तपासून तशा पद्धतीची माहिती देखील समोर आलेली आहे.
तीन नव्हे 4 बंदूकीचा वापर?
बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना आतापर्यंत फक्त तीन शस्त्रांची माहिती होती. मात्र, आरोपींकडे तीन नव्हे तर चार शस्त्रे असल्याचे आता तपासादरम्यान समोर आले आहे. आरोपींनी वापरलेलं 4 थे पिस्तूल हे ऑस्ट्रेलिया निर्मित ब्रेटा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.












Click it and Unblock the Notifications