Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यातील 15 सरपंच ठरणार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार! स्वातंत्र्यदिनी आहेत विशेष पाहुणे, यादी वाचा

Independence Day Celebration : राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या 79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 210 ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 सरपंचांचा समावेश असून यात 9 महिला सरपंच आहेत. 15 ऑगस्ट रोजी हे सर्व सरपंच लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत.

केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून या सर्व सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे. या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सुधारणा घडवल्या आहेत. या वर्षीच्या विशेष पाहुण्यांमध्ये लक्षणीय संख्येने महिला सरपंचांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील 210 सरपंचांचा यात समावेश असून महाराष्ट्रातील 15 सरपंच प्रमुख पाहुणे असणार आहेत.

Independence Day Celebration


या सरपंचांनी त्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा, सुधारित सार्वजनिक सेवा आणि समावेशक सामुदायिक उपक्रम यासारख्या दृश्यमान सुधारणा घडवून आणल्या आहेत. या सरपंचांनी हर घर जल योजना, प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण, मिशन इंद्रधनुष इत्यादी प्रमुख सरकारी योजनांना पूरक ठरविण्यात लक्षणीय यश मिळवले आहे आणि त्याचबरोबर तळागाळात नाविन्यपूर्ण स्थानिक उपक्रम/उपायांना प्रोत्साहन दिले आहे म्हणून त्यांना ही गौरवाची संधी मिळाली आहे.

महाराष्ट्रातील हे सरपंच असतील प्रमुख पाहुणे

प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर)
जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाका, ता. कामठी, जि. नागपूर)
संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे)
डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडी, ता. अकोला, जि. अकोला)
नयना अशोक भुसारे (भावसे, ता. शहापूर, जि. ठाणे)
सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशिम)
अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली)
संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर)
चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपार, ता. सालेकसा, जि. गोंदिया)
रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवार, ता. लाखनी, जि. भंडारा)
सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी)
पार्वती शेषराव हरकल (कुंभारी, ता. जिंतूर, जि. परभणी)
प्रमोद किसन जगदाळे (बिदल, ता. मान, जि. सातारा)
शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती)
प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, ता. उदगीर, जि. लातूर)

हेही वाचा : Independence day 2025 : कधी आणि कुठे पाहता येणार 15 ऑगस्ट कार्यक्रमाचा लाईव्ह सोहळा, जाणून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+