Independence day 2025 : कधी आणि कुठे पाहता येणार 15 ऑगस्ट कार्यक्रमाचा लाईव्ह सोहळा, जाणून घ्या
Independence day 2025 : स्वातंत्र्य दिनाचा सोहळा न भुतो न भविष्यती असा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाचा तिरंगा ध्वज फडकवतील. यंदा भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा सोहळा साजरा होत आहे. हा सोहळा बघावा ही मनोमन अनेकांची इच्छा असते, पण प्रत्यक्ष जाता येतेच असे नाही पण जर तुम्हाला जायचे असेल तर आताच तिकीटे बुक करावी लागणार आहेत.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी देशभरातून लोक लाल किल्ल्यावर येतात. या कार्यक्रमाला राजकारणी, अधिकारी आणि अनेक प्रसिद्ध व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तुम्हालाही हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहायचा असेल, तर तुम्ही आगाऊ तिकीट बुक करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही हा कार्यक्रम घरबसल्या थेट प्रक्षेपणाद्वारेही पाहू शकता.

थेट प्रक्षेपण कुठे आणि कसे पाहावे?
जर तुम्ही लाल किल्ल्यावर जाऊ शकत नसाल, तरीही हा समारंभ थेट पाहू शकता.
- दूरदर्शन नॅशनल (Doordarshan National) आणि दूरदर्शन न्यूज (Doordarshan News) या वाहिन्यांवर याचे थेट प्रक्षेपण होईल.
- संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) आणि पंतप्रधान कार्यालयाच्या (Prime Minister's Office) अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
- अनेक खासगी वृत्तवाहिन्या (news channels) आणि त्यांच्या मोबाईल ॲप्सवरही हा कार्यक्रम थेट पाहता येईल.
- फेसबुक आणि एक्स (ट्विटर) यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अधिकृत हँडलद्वारे लाइव्ह अपडेट्स आणि व्हिडिओ उपलब्ध असतील.
सोहळ्यासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रिया
संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करता येतात. त्यासाठी खालील टप्पे (स्टेप्स) फॉलो करा.
- aamantran.mod.gov.in किंवा e-invitations.mod.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
- मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
- "Independence Day 2025 Ticket Booking" हा पर्याय निवडा.
- नाव, मोबाईल नंबर आणि तिकीट संख्या भरा.
- ओळखीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्राची प्रत अपलोड करा.
- २०, १०० किंवा ५०० रुपयांचे ऑनलाइन शुल्क भरा (जागेनुसार).
- बुकिंगनंतर तुम्हाला क्यूआर कोडसह ई-तिकीट मिळेल.
ऑफलाइन तिकीट कुठे मिळतील?
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी काही तिकीट ऑफलाइनही विकली जातात. ही तिकीट केवळ काही विशिष्ट सरकारी इमारती आणि विशेष काउंटरवर उपलब्ध असतील. ऑफलाइन तिकिटांची संख्या मर्यादित असल्याने, ती लवकर खरेदी करणे चांगले.
कार्यक्रमाची वेळ आणि कसे पोहचाल
- समारंभ सकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
- पाहुण्यांना सकाळी ६:३० ते ७:०० च्या दरम्यान पोहोचण्याचा सल्ला दिला जातो.
- लाल किल्ला आणि चांदनी चौक ही जवळची मेट्रो स्टेशन आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त मेट्रो सेवा सकाळी ४ वाजल्यापासून सुरू होईल.
- खासगी वाहनाने येणाऱ्यांना सुरक्षा तपासणीतून जावे लागेल.












Click it and Unblock the Notifications