india Vs Pak मॅचवरुन राजकारण तापलं! ठाकरेंचा दणका अन् PVR ची माघार, वाचा नेमकं काय घडलं!
Ind vs Pak Match PVR Withdraws Live Streaming : आशिया कपमधील बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याच्या लाईव्ह स्ट्रिमिंगवरून महाराष्ट्रात मोठा राजकीय आणि भावनिक वाद निर्माण झाला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या तीव्र विरोधानंतर पीव्हीआर सिनेमा (PVR Cinemas) व्यवस्थापनाने महाराष्ट्रातील त्यांच्या सिनेमागृहांमध्ये हा सामना न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

'दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र नाही'
पीव्हीआर सिनेमाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून घोषणा केली होती की, ते देशभरातील १०० हून अधिक स्क्रीन्सवर भारत-पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहेत. या घोषणेनंतर शिवसेना ठाकरे गट तातडीने आक्रमक झाला.
ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, पाकिस्तानने भारतावर अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत, ज्यात पहलगामसारख्या घटनांमध्ये निरपराध भारतीयांनी आपला जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे, तो दाखवणे किंवा पाहणे हे शहिदांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान असून, तो देशद्रोह आहे. "क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही," अशी ठाम भूमिका ठाकरे गटाने घेतली.
हा तर नीच पणाचा कळस:
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 28, 2025
PVR मधील” पी “ म्हणजे पाकिस्तान आहे काय?
हे पीव्हीआर वाले भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्वत्र दाखवणार आहेत.
ह्यांच्यात एवढी हिम्मत आणि निर्ल्लजपणा येतो कोठून?
सोनम वांगचुक याना पाकिस्तानशी सहानुभूती ठेवल्याच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवून अटक… pic.twitter.com/GY7343t8UK
'देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!'
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून पीव्हीआर व्यवस्थापनावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, "देशद्रोहाच्या आरोपाखाली पीव्हीआरवाल्यांना अटक करा.
भारत पाकिस्तान सामना खेळणे, खेळवणे, दाखवणे, पाहाणे, हा पहलगाममधील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आहे, देशद्रोह आहे. पीव्हीआर, तुमच्याकडे हिंदुत्ववादी जनतेचे लक्ष्य आहे." राऊत यांच्या या कठोर शब्दांनंतर पीव्हीआरवर दबाव आणखी वाढला.
#शिवसेनेचा_ठाकरी_दणका : महाराष्ट्रात PVR चित्रपटगृहातून 'भारत–पाकिस्तान क्रिकेट सामन्या'चं लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जाणार नाही... @AUThackeray @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @akhil1485 pic.twitter.com/HblXQEuA9T
— शिव संचार सेना - Shiv Sanchar Sena (@shivsancharsena) September 28, 2025
PVR ची माघार: महाराष्ट्रात लाईव्ह स्ट्रिमिंग नाही!
ठाकरे गटाच्या या तीव्र विरोधाची दखल घेत पीव्हीआर सिनेमाने आपला निर्णय बदलला आहे. पीव्हीआरने आता स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्रातील त्यांच्या कोणत्याही सिनेमागृहात भारत आणि पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवण्यात येणार नाही.
या संबंधी पीव्हीआरचे प्रोग्रामिंग आणि ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस डिसोझा यांनी शिवसेनेशी संपर्क साधला आणि हा निर्णय कळवला, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी माध्यमांना दिली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवरून भारतात होणारे राजकीय आणि भावनिक परिणाम समोर आले आहेत. तसेच, जनमताचा दबाव आणि राजकीय पक्षांच्या भूमिका यामुळे व्यावसायिक निर्णयांवर कसा परिणाम होतो, हे देखील स्पष्ट झाले आहे.












Click it and Unblock the Notifications