Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभाला मविआनं गमावलं, मात्र लोकसभेला राखलं; वाचा नेमकं काय झालं?

नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. मात्र लोकसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसने आपला जलवा कायम ठेवला. तेथे अटीतटीच्या लढतीत रवींद्र चव्हाण हे विजयी झाले.

Ravindra Chavhan

नांदेडमध्ये महायुतीचाच बोलबाला

नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यामध्ये किनवट, भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, हदगाव, लोहा, देगलूर आणि मुखेड या मतदारसंघाचा समावेश आहे. या बहुतेक मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगला होता. नांदेडच्या 9 विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यात भाजपने 5, शिवसेना शिंदे गटाने 3 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एका जागेवर विजयी पताका फटकविली. महाविकास आघाडीला येथे खातेही उघडता आले नाही.

लोकसभेत मात्र काँग्रेसची पताका

एकीकडे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेस व महाविकास आघाडीने लोकसभा पोटनिवडणुकीत मात्र मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. सुरुवातीच्या कलात भाजप उमेदवार डॉ. संतुकराव हुंबर्डे आघाडीवर होते. मात्र रात्री उशिरा या निकालात फेरबदल झाला. नांदेडमधील लोकसभा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने बाजी मारली आहे. भाजपचे डॉ. संतुकराव हुंबर्डे यांना 5 लाख 85 हजार 331 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना 5 लाख 86 हजार 788 मते मिळाली. रवींद्र चव्हाण यांनी 1 हजार 457 मतांनी भाजपच्या डॉ. हुंबर्डे यांचा पराभव केला. वंचित बहुजन आघाडीचे अविनाश विश्वनाथ यांना तिसऱ्या क्रमांकाची 80 हजार 179 मते मिळाली.

चव्हाण कुटुंबात दुसऱ्यांदा खासदारकी

काही महिन्यांपूर्वी निवडणूक झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील यांचा सुमारे 60 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचे निधन झाले. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेड लोकसभा जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच या पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे सुपूत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. आता या निवडणुकीत विजयी होत, चव्हाण यांनी आपल्याच घरात खासदारकी कायम ठेवली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+