Municipal election: महापालिका निवडणुकीसाठी न्यू मतदार यादी जाहीर; अशी करा प्रभागनिहाय यादी डाऊनलोड!
Municipal corporation election : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग कसोशीने काम करत आहे. या निवडणुकांसाठीची अद्ययावत मतदार यादी आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार यादीत तुमचे नाव आहे का, तुमचा प्रभाग कोणता आणि मतदान केंद्र कोठे आहे, हे आता एका क्लिकवर तपासता येणार आहे.

मतदार यादी डाऊनलोड करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत:
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. खालीलप्रमाणे तुम्ही तुमची प्रभागनिहाय यादी डाऊनलोड करू शकता....!
१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम mahasecvoterlist.in किंवा localbodyvoterlist.maharashtra.gov.in या पोर्टलवर जा.
२. पर्याय निवडा: होम पेजवर असलेल्या 'Download Voter List' किंवा 'मतदार यादी डाऊनलोड करा' या पर्यायावर क्लिक करा.
३. निवडणुकीचा प्रकार: येथे 'महानगरपालिका' (Municipal Corporation) हा पर्याय निवडा.
४. जिल्हा आणि महापालिका: तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि संबंधित महानगरपालिकेचे (उदा. पुणे, नाशिक, मुंबई) नाव निवडा.
५. प्रभाग आणि यादीचा प्रकार: तुमचा प्रभाग क्रमांक (Ward Number) निवडा. त्यानंतर 'प्रारूप यादी' (Draft List) किंवा 'अंतिम यादी' (Final List) यापैकी आवश्यक असलेला पर्याय निवडा.
६. डाऊनलोड करा: सर्व माहिती भरल्यानंतर 'Search' बटणावर क्लिक करा. तुमच्या प्रभागाची यादी PDF स्वरूपात समोर येईल, जी तुम्ही डाऊनलोड करून सेव्ह करू शकता.
नाव शोधण्यासाठी 'मताधिकार' (Matadhikar) ॲपचा वापर
यादी डाऊनलोड न करता मतदार यादीत नाव कसे शोधायचे?
जर तुम्हाला संपूर्ण यादी डाऊनलोड न करता केवळ तुमचे नाव शोधायचे असेल, तर तुम्ही 'Matadhikar Voter App' हे अधिकृत मोबाईल ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. यामध्ये नाव, आडनाव किंवा ओळखपत्र (EPIC) नंबर टाकून तुमचे मतदान केंद्र आणि प्रभाग शोधणे सोपे जाते.
महत्त्वाची टीप: विधानसभा निवडणुकीसाठी वापरली जाणारी यादी आणि महानगरपालिका निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय यादी यात फरक असू शकतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय यादीच तपासावी. यादीत नाव नसल्यास किंवा चुका असल्यास, निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत हरकती व सूचना नोंदवणे आवश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications