Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kunbi caste certificate : कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा? कोणते कागदपत्रे हवे, वाचा फायदे

How to apply for Kunbi caste certificate in marathi : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मुंबईत नुकताच उपोषण केले आहे. या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केले आहेत. त्यानंतर मनोज जरांगे यांचा मोठा विजय झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने हैदराबाद आणि सातारा गॅझेटीयर लागू करण्यासाठी पाऊले उचलली असून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत.

How to apply for Kunbi caste certificate in marathi

मराठा समाजाची मोठी मागणी मान्य झाल्यानंतर आता समाजात मोठे चैतन्य निर्माण झाले आहे. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात आरक्षणाचा थेट लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात या प्रक्रियेबाबत प्रशासन सक्रिय झाले असून त्या त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचनाही करण्यात आले आहेत.

पात्र अर्जदारांना कोणती अडचण येऊ नये त्यासाठी राज्य सरकारच्या प्रशासकीय विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने जात प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त विलंब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही राज्य सरकारने सांगितले आहे. अनेकांना कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे हे माहिती आहेच असे नाही, म्हणूनच आता आपण जाणून घेऊया.

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम कुणबी जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
  • प्रमाणपत्र काढण्यासाठी 'आपले सरकार पोर्टल' वर अर्ज करता येणार आहे.
  • आपले सरकार पोर्टल हे राज्य शासनाचे अधिकृत पोर्टल आहे.
  • (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) या साइटवर सूचनांचे पालन करून व्यवस्थितरित्या अर्ज भरायचा आहे.
  • त्यासह आवश्यक कागदपत्रे आपल्याला ऑनलाईन फिलअप करायचे आहेत.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तहसील कार्यालयात सादर करावी लागते. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी आणि प्रत्यक्ष पडताळणी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण होतात.

तुम्ही दिलेल्या प्रत्यक्ष अर्जाची आणि ऑनलाईन नोंदणीची पडताळणी केल्यानंतर ही माहिती योग्य असल्यास त्याचा अहवाल अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल.

या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर कुणबी जात प्रमाणपत्र जारी केले जाईल.
जर सादर केलेल्या अर्जात माहितीमध्ये विसंगती किंवा कागदपत्राची कमतरता आढळल्यास अर्जदाराला यासंबंधी माहिती दिली जाईल.

कुणबी प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे?

  • जमिनीचे जुने रेकॉर्ड
  • सातबारा आठ अ उतारा
  • कुणबी असा उल्लेख असलेले जुने सरकारी दाखले
  • प्रस्तावित वंशावळ किंवा कौटुंबकी इतिहास दर्शवणारा पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टीसी (त्यात जात स्पष्ट नोंदलेली असावी)
  • जर पालक किंवा आजोबांच्या नावाने आधीपासून जात प्रमाणपत्र असेल तर तोही पुरावा ग्राह्य धरला जातो.
  • राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार ज्या अर्जदाराकडे ही सर्व कागदपत्रे योग्य आणि पूर्ण असतील त्यांना प्रमाणपत्र तत्काळ मिळू शकेल

कुणबी प्रमाणपत्राचा काय होणार उपयोग?

  • कुणबी प्रमाणपत्र हे एखाद्या व्यक्तीच्या जातीचा अधिकृत पुरावा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अनुदान तसेच शासकीय योजनांचा लाभ घेता येतो.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रवेश व शिष्यवृत्ती मिळू शकते.
  • स्पर्धा परीक्षांमध्ये आणि इतर राज्य शासनाच्या परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळतो.
  • शासकीय नोकऱ्यांमध्ये राखीव जागांसाठी पात्रता मिळते तसेच सहकारी संस्था व बँकांच्या योजनांमध्ये प्राधान्य मिळेल.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+