मोठी बातमी! आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू बेपत्ता; शेवटचा फोन झाला अन् त्यानंतर...
आ. रत्नाकर गुट्टे यांचा नातू पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे बेपत्ता होऊन आता तीन दिवस झाले आहेत. एक जानेवारीला सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडलेल्या आ. गुट्टे यांच्या नातवाचा अद्याप कोणताच ठावठिकाणा लागलेला नाही. याच कारणाने आ. गुट्टे हे आज परभणीत झालेल्या आक्रोश मोर्चात सहभागी होऊ शकले नाहीत, असं आ. गुट्टे यांनी स्वतः सांगितलं. दरम्यान, आमदाराचा नातू बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय झालं?
आ. रत्नाकर गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा सुमीत भागवत गुट्टे (वय २४) हा एक जानेवारीला ज्युपिटर हाँस्पीटल पुणे येथे मुलाखतीसाठी जातो, असं सांगून घरातून बाहेर पडला. त्यानंतर दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी त्याच्या कुटुंबियाचं त्याच्याशी फोनवर शेवटचं बोलणं झालं होतं. मात्र तेव्हापासून सुमीत हा बेपत्ता आहे. याबाबत त्याच्या कुटुंबियांनी पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्याच मिसींगचा गुन्हा दाखल केला असून, पुणे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
काय म्हणाले आ. गुट्टे?
या प्रकरणाबाबत आ. गुट्टे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझा नातू मिसिंग आहे. त्यामुळे मी सध्या वेगळ्याच दु:खात आहे. माझा नातू मिसिंग असल्यामुळे मी परभणीमध्ये झालेल्या आक्रेश मोर्चात सहभागी होऊ शकलो नाही. माझा नातू एक जानेवारीपासून मिसिंग आहे. माझ्या भाचीनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद आहे. तो एक जानेवारीला सकाळी 9 वाजता घराबाहेर पडला होता.
मुख्यमंत्र्यांशी झालं बोलणं
याबाबत अधिक माहिती देताना आ. गुट्टे यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. एक जानेवारीला दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे, असंही आ. गुट्टे यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications