Girish Mahajan Biography : फडणवीसांचे विश्वासू गिरीश महाजनांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, वाचा प्रवास
Girish Mahajan Biography : भाजपचे संकटमोचक आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा आपला बालेकिल्ला शाबुत ठेवला. तर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीसांचे विश्वासू व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपसमोर कोणतेही संकट उभे राहिले तर गिरीश महाजन त्याला सामोरे जातात, अशी देखील त्यांची ओळख आहे. त्यांना या मंत्रिमंडळात चांगले खाते मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चला तर जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला.
भाजपसाठी जामनेरची जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे. कारण तेथून गिरीश महाजन नशीब आजमावत होते. १९९२ साली गिरीश महाजन प्रथम ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. १९९५ सायली जामनेर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले आणि त्यानंतर सातत्याने त्यांनी हा मतदारसंघ जिंकून घेतला. ही त्यांची त्यांची सातवी टर्म आहे.

जळगाव जिल्ह्यात भाजपचे आमदार असूनही तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांचेच जळगाव जिल्ह्यावर वर्चस्व होते. २०१४ साली हे चित्र पालटले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ खडसे हे महसूल मंत्री झाले. आपल्या ज्येष्ठत्वाला डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याची खंत खडसे यांच्या मनात होती आणि त्यातून भाजपात खडसे - फडणवीस असा संघर्ष सुरु झाला आणि त्यात खडसे पिछाडीवर पडले. याच काळात गिरीश महाजन यांचा महाराष्ट्रराच्या सत्ताकेंद्रातला प्रभावी चेहरा म्हणून उदय झाला. फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून महाजन यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.
शेतकऱ्यांचे आंदोलन असो किंवा आलेला महापूर, किंवा कोणत्याही संघटनांशी चर्चा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. प्रत्येक ठिकाणी गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मदतीला धावून गेले आणि फडणवीस यांनीही विश्वासाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात गिरीश महाजन चक्क पुराच्या पाण्यात उतरले होते. २०१९ साली भाजपचे सरकार गेल्यानंतर गिरीश महाजन हे संकटात सापडले.
राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न केले. महाजन यांना अडकवण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले. पण फडणवीस यांनी शिताफीने त्यांचा बचाव केला. महाजन यांना मोक्काच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न चक्क विधिमंडळात पुरावे सादर करून फडणवीस यांनी हाणून पाडला.
राज्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर गिरीश महाजन हे संकटमोचकाच्या मूळ भूमिकेत शिरले आणि त्यांनी पूर्वीच्याच धडाक्याने काम करण्यास सुरुवात केली. फडणवीस यांनी त्याच्यावर ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी सोपवली. आपल्या खात्यात महाजन यांनी चांगली कामगिरी केली. या निवडणुकीत गिरीश महाजन यांना पराभूत करण्याचे प्रचंड प्रयत्न महाविकास आघाडीकडून करण्यात आले. पण महाजन या प्रयत्नांना पुरून उरले. ताज्या विजयामुळे महाजन यांचे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील स्थान आणखी भक्कम झाले आहे.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ!








Click it and Unblock the Notifications