Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महिला अत्याचाराबाबत गौतमी पाटीलचे वक्तव्य; म्हणाली- मुलींनो बिनधास्त लढायचं कुणालाही घाबरायचं नाही

Gautami Patil on Women Atrocities : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच बदलापूर इथं घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं समाजमनही हादरलं. तर राजकारणही जोरदार तापलं. या घटनांवर सर्वच जण चिंतेत असतानाच महिला सुरक्षेवर राजकीय धुमशान सुरु झालं. महिला नेत्यांनीही यावरुन चिंता व्यक्त केलीय. असे असताना कलाकार मागे कसे राहणार. जी गौतमी पाटील आपल्या नृत्याच्या अदांनी अनेकांना घायाळ करते. तीच गौतमी पाटील ही संवेदनशील आहे, एका उदाहरणावरून दिसून आले. एका कार्यक्रमात तिला महिला अत्याचारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तिने कलेले विधान देखील देखील महत्त्वपूर्ण आहे. तिने मुलींसह विवाहित महिलांना दिलेला सल्ला मोलाचा आहे. तर मुलींनो घाबरू नका, बीनधास्त नडा, असा सल्ला देखील गौतमी पाटीलने दिला.

कुणाच्या दबावाखाली राहू नका

गौतमी पाटील हिच्या नृत्य कार्यक्रम नुकताच अमरावतीत पार पडला.या कार्यक्रमानंतर तिला एका माध्यमाच्या प्रतिनिधीनं होत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनासंबधीत प्रश्न विचारला. त्यावेळी तिनं दिलेलं उत्तर महिला अत्याचाराच्या दृष्टीनं महत्वाचं आणि महिला, मुलींना धीर देणारं होतं. गौतमी म्हणाली की, मुलींनो बिनधास्त लढायचं कुणालाही घाबरायचं नाही. उलट त्रास देणाऱ्यांना नडायचं असा सल्ला गौतमी पाटीलने दिला आहे. गेल्या काही दिवसांत आपण महिला अत्याचाराच्या घटना बघितल्या आहेत. येथे बाहेरगाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की, स्वतःची काळजी घ्या. कुणाच्या दबावाखाली राहू नका.

Gautami Patil

राजकारणात जाणार नाही

अमरावतीत माध्यमांशी बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, अमरावतीत येण्याची माझी पहिलीच वेळ आहे आणि इथं मला मिळालेलं प्रेम बघून मला खूप बरं वाटलंय. प्रेक्षकांचं आणि महिला वर्गाचं प्रेम बघून छान वाटलं. राजकारणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाली की, मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे, माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. मी एक कलाकार आहे. मी कला दाखवते. मी राजकारणात अजिबात जाणार नाही." असं म्हणत तिनं आपली राजकीय भुमिकाही स्पष्ट केली. एकंदरीतच गौतमी आणि तिच्यासारखे अनेक कलाकार महिला अत्याचारांच्या घटनांवर व्यक्त होत असून महिला, मुलींना धीर देण्यासाठी पुढे येत आहेत, कलाकार कला तर दाखवताच पण समाजभानही जपतात हेही यावरुन दिसून येते.

गौतमीसह आमदार धुर्वेंच्या डान्सची चर्चा

भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी उमरखेड येथील एका दहीहंडी कार्यक्रमात नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरुन विरोधकांनी संदीप धुर्वे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला संदीप धुर्वे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आग्रह होता की,आमचे सर्व तरूण मुले आहेत. जमाव अतिशय मोठा होता. गौतमी पाटील या खूप फेमस आहेत. कोणासोबत नाचत नाही, मात्र ती माझ्या सोबत नाचली. उलट शेतकऱ्यांना पीक विमा साठी बैठक लावून एक लाख 98 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळून दिला. इ पीक पाहणीचे अट रद्द केली. नुकसानीची पहिले पंचनामे करण्याचे निर्देश दिले. विरोधी पक्ष फक्त राजकारण करत आहे, असे उत्तर संदीप धुर्वे यांनी दिले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+