दसऱ्याच्या दिवशी काळ बनला 'तलाव'; गंगापूरमध्ये ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या 4 मुलांचा बुडून मृत्यू!
Accident News : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे दसऱ्याच्या सणादिवशी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. उत्सवाच्या वातावरणात, ट्रॅक्टर धुण्यासाठी तलावाच्या बॅकवॉटरमध्ये गेलेल्या 9 ते 17 वयोगटातील चार निष्पाप मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण लिंबे जळगाव गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय घडली?
दसऱ्याच्या निमित्ताने कुटुंबातील वाहने धुण्याची प्रथा आहे. याच प्रथेनुसार, लिंबे जळगाव येथील काही मुले गावाजवळील तलावातील बॅकवॉटरमध्ये ट्रॅक्टर धुण्यासाठी गेली होती. यावेळी ही मुले पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने किंवा इतर कोणत्या कारणामुळे एकापाठोपाठ एक पाण्यात बुडाली. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे.

पाण्यात बुडालेल्या मुलांची नावे
अपघातात मृत्यू झालेल्या मुलांमध्ये खालील चार मुलांचा समावेश आहे:
- व्यंकटेश दत्तात्रय तारक (वय ११ वर्ष)
- इरफान इसाक शेख (वय १७ वर्ष)
- इम्रान इसाक शेख (वय १२ वर्ष)
- जैनखान हयात खान पठाण (वय ९ वर्ष)
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, मुलांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
उत्सवाच्या दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दसऱ्यासारख्या पवित्र आणि आनंदाच्या सणादिवशी चार तरुण मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच वेळी चार मुलांच्या मृत्यूच्या बातमीने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सणाचे वातावरण शोकात बदलले आहे.
प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या, नाले, ओढे आणि तलाव भरून वाहत आहेत. त्यामुळे पाण्याच्या पातळीचा आणि प्रवाहाचा अंदाज घेणे कठीण झाले आहे.
प्रशासनाकडून सातत्याने वाहत्या पाण्यात जाऊ नका किंवा पाण्याशी खेळू नका, असे आवाहन केले जात आहे. मात्र, दुर्देवाने या आवाहनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही भीषण घटना घडली आहे. या घटनेने पाणी साठलेल्या ठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications