सातव्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करत आहात? जाणून घ्या मुहूर्त
Ganesh visarjan : देशात सर्वत्र गणेशोत्सवाचे उत्साहाचं वातावरण आहे. अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीचे आगमन झाले यांनंतर गौरी आगमन आणि विसर्जनही झाले, शिवाय दिड दिवसांच्या आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जनही झाले.
गणेशोत्सव 10 दिवसांचा असला तरी सातव्या दिवशीही गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. जर तुम्ही सातव्या दिवशी गणेश विसर्जन करत असाल तर यासाठी शुभमुहूर्तावर बाप्पाचं विसर्जन केल्यास ते शुभ आणि लाभदायक असते असे सांगितले जाते. तर चला तर मग जाणून घेऊया सातव्या दिवशी विसर्जनाचा कोणता शुभ मुहूर्त आहे.

सातव्या दिवशी गणरायाच्या विसर्जनासाठी शुभ मुहूर्त
दहा दिवसांच्या गणोशोत्सवात गणपतीचे चार दिवस असते. विसर्जन दीड दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाच्या मुर्तींचे विसर्जन केले जाते. अनेक जण सातव्या दिवशी देखील गणरायचं विसर्जन करतात.
पंचांगानुसार सातव्या दिवशी बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जनाचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी 6.04 वाजता सुरु होणार असून आणि सकाळी 10.43 पर्यंत हा राहील. यानंतर दुसरा मुहूर्त 12:16 वाजता सुरू होऊन 01:49 वाजेपर्यंत राहणार आहे. संध्याकाळचा शुभ मुहूर्त 04:54 ते 06:27 या वेळेत आहे.
विसर्जनाचा'हा' दिवस सर्वात महत्वाचा
विघ्नहर्त्या गणरायाप्रति भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भावना असते. आबालवृद्धांना गणपतीच्या आगमनाची प्रतीक्षा असते. गणपतीच्या आगमनानंतर काही दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर निरोप देताना गलबलूनजाते. अशाच चार दिवसांचा गणपती अधिक शुभ मानला जातो. पण सर्वात जास्त महत्त्व अनंत चतुर्थीचं असतं. म्हणजे दहावा दिवस. दहाव्या दिवशी गणरायाची पूजा केली जाते आणि हा दिवस गणेश विसर्जन म्हणून ओळखला जातो.
अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जनाचा किती वाजता मुहूर्त
यंदा मंगळवार 17 ऑगस्ट रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी 16 सप्टेंबर 204 रोजी दुपारी 3.10 पासून सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी 17 सप्टेंबर रोजी रात्री 11:44 वाजता संपेल. मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येत आहे.
विसर्जन करताना या गोष्टींची घ्या काळजी
" गणेशाचे विसर्जन करताना त्याचे तोंड घराकडे असावे."
"गणपतीला जल अर्पण करा आणि नवीन कपडे घाला."
पती-पत्नीमध्ये कोणी मांगलिक असेल तर गणपतीला सिंदूर अर्पण करावा. यामुळे मांगलिक दोष कमी होतो.
या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख-समृद्धी वाढते.
"परमात्म्याची पूजा कर्मकांडानुसार करा. नैवद्य अर्पण करा."
" गणेशाला दुर्वा अर्पण करा ."
"धूप आणि दिवा लावा आणि आरती करा."
"शेवटी, याचनेसाठी प्रार्थना करा."












Click it and Unblock the Notifications