Ganesh Chaturthi 2024 : 4 मुद्द्यांत समजून घ्या गणेश विसर्जन कधी करावे कधी आहे मुहुर्त
Ganesh Chaturthi 2024 Ganesh Visarjan Tips, Muhurta Timing :गणरायाच्या आगमनानंतर आता निरोपाचीही चाहूल लागली आहे. गणेशाची गेल्या सात-आठ दिवसांत भक्तांनी मोठ्या आनंदात आणि भक्तीमय वातावरणात पुजा आणि आराधना केली. विविध राज्यांसह महाराष्ट्रात गणेश उत्सवाची सध्या धूम आहे.
अनेक भक्त काळाच्या ओघात आता दहा दिवसांऐवजी दीड, अडीच आणि सात दिवस गणपतीची प्रतिष्ठापणा करतात. पण महाराष्ट्रात सार्वजिनक गणेश मंडळ असो की, कोट्यवधी कुटुंबात प्रतिष्ठापणा केलेले श्री गणेश असो या सर्वांचे विसर्जन दहाव्या दिवशी होत असते.

यंदाचे गणपती विसर्जन येत्या 17 सप्टेंबरला आहे. या दिवशी महाराष्ट्रात मोठी धामधूम असते. गणेशाची मोठी मिरवणूक काढली जाते. विविध फुलांनी आणि आकर्षक सजावट बप्पांच्या वाहनाची केली जाते. त्यानंतर गणेशाच्या जयघोषात मिरवणूक निघते आणि नंतर विसर्जन सोहळा पूर्ण होतो.
गणेशाचे आगमन असो की पूजन अथवा विसर्जन मुहुर्ताला भारतीय परंपरेत मोठे स्थान आहे. मुहुर्त खूप महत्वाचा आणि शुभही मानला जातो. यंदाच्या गणेश विसर्जनाचा शुभ मुहुर्त कधी आहे. हे जाणून घेऊया..
गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त
1. 17 सप्टेंबर 2024 रोजी गणपती विसर्जनाचा
2. मुहूर्त सकाळी 09:10 ते दुपारी 01:46 पर्यंत असेल.
3. या काळात दुपारचा मुहूर्त दुपारी 03:18 ते 04:50 पर्यंत आहे.
4. याशिवाय संध्याकाळची वेळ 07.51 ते 09:19 अशी असेल. या मुहूर्तानुसार तुम्ही गणेश विसर्जन करू शकता.
विसर्जनापुर्वी हे करा...
- " गणेशाचे विसर्जन करताना त्याचे तोंड घराकडे असावे."
- "गणपतीला जल अर्पण करा आणि नवीन कपडे घाला."
- पती-पत्नीमध्ये कोणी मांगलिक असेल तर गणपतीला सिंदूर अर्पण करावा. यामुळे मांगलिक दोष कमी होतो.
- या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख-समृद्धी वाढते.
- "परमात्म्याची पूजा कर्मकांडानुसार करा. नैवद्य अर्पण करा."
- " गणेशाला दुर्वा अर्पण करा ."
- "धूप आणि दिवा लावा आणि आरती करा."
- "शेवटी, याचनेसाठी प्रार्थना करा."












Click it and Unblock the Notifications