Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

GSB Pandal Story :मुंबईत 69 किलो सोन्याने सजणार गणपती! असेही श्रीमंत बप्पा अन् 400 कोटींचा विमा!

ganesh chaturthi, GSB Pandal Story: यंदा गणेश महोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू होत असून 17 सप्टेंबरला गणेश विसर्जन होणार आहे. महाराष्ट्रात तर या काळात मोठी धुम असते. विशेषतः महाराष्ट्रात गणपती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. मुंबईतील गणेशोत्सव तर आनंदाची पर्वणीच असते. आता समस्त गणेशभक्तांना गणपतीच्या आगमनाची आस लागलेली आहे.

राज्यात यंदा गणेशोत्सवाची चांगलीच धुम असून सर्वत्र आठ ते दहा दिवस आधीच गणेश मंडळ सजावट आणि पेंडाल टाकण्याची तयारी सुरु केली आहे. लाडक्या बप्पा हे सर्व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या आगमनासाठी भक्तगण जय्यत तयारी करत आहेत.

GSB Pandal Story

मुंबईतील लालबागचा राजाची मोठी ख्याती आहे. पण, मुंबईत आणखी एक गणपती असा आहे ज्याची फारशी माहिती सर्वांनाच आहे असे नाही. हे गणपती बप्पा आपली संपत्ती, करोडो रुपयांचा विमा आणि विशेष पूजाविधी, मंडप, व्यवस्था आणि परंपरांमुळे चर्चेत राहतात. मुंबईतील वडाळा येथील किंग्ज सर्कलजवळील जीएसबी सेवा मंडळाचा हा महागणपती आहे. जीएसबी म्हणजे गौर सारस्वत ब्राह्मण म्हणजे त्यांचा पंडाल हे स्वयंपाकी आणि हे कामगारही.

यंदा 69 किलोची मुर्ती

गेल्या वर्षी जीएसबी पंडालमध्ये बाप्पाची मूर्ती 66 किलो सोने आणि 295 किलो चांदीने सजवण्यात आली होती. यावेळी बाप्पाची मूर्ती 69 किलो सोन्याचे दागिने आणि 336 किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवली जाणार आहे. यावेळी गणपती पंडालचा 400 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच पंडाल पूर्णपणे आगविरोधी (फायर प्रूफ) करण्यात येत आहे.

क्यूआर कोडद्वारे प्रवेश

जीएसबी पंडालमध्ये दर्शन घेण्यासाठी प्रथम वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला एक QR कोड मिळेल. त्याचे स्कॅनिंग केल्यानंतर पंडालमध्ये प्रवेश करता येणार आहे. पंडालमध्ये दररोज सुमारे 16 हजार लोक भोजन करू शकतील आणि प्रत्येक भक्ताला प्रसादाची पिशवी दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी पंडालमध्ये दररोज 20 हजार लोक आले होते. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे.(ganesh chaturthi Ganesh idol in Mumbai 69 kg gold 400 crore insurance GSB Pandal Story)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+