गणपती बाप्पाच्या आगमनाने फूल बाजार बहरला, 'या' फुलाला मिळाला सर्वाधिक भाव
ganesh chaturthi : राज्यासह देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवामुळे फुलांना मागणी वाढली असून, सर्व प्रकारच्या फुलांचे दर तेजीत आहेत. बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांना मोठी मागणी आहे. यामुळे दरात देखील वाढ झाली आहे. फूलांच्या खरेदीसाठी पुणे येथील मार्केट यार्डमधील फूल बाजारात तसेच दादरमधील फूल बाजारात गर्दी पहायला मिळाली. दर वाढल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे.
फुलांचे दर शंभरी पार
आपला लाडका बाप्पा खुलून दिसावा यासाठी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फूल खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली. झेंडू, गुलाब, चमेली अश्या विविध प्रकारच्या फुलांची मागणी वाढल्यामुळं दरात देखील मोठी वाढ झाली. फुलांचे दर शंभरी पार गेले.

पुणे मार्केट फूल बाजारातील फुलांचे दर
झेंडू : 80 ते 150 रुपये किलो
शेवंती: 200 ते 250 रुपये
गुलाब: 200 रुपायाला 20 फूल
अस्टर: 250 ते 300 रुपये किलो
बिजली : 200 ते 250 रुपये
लिली : 50 रुपये किलो
फूल बाजारात गुलछडीची आवक सगळ्यात कमी झाल्याने गुलछडीला सगळ्यात जास्त भाव मिळाला. गुलछडीला प्रति किलो गुलछडी 1400 इतका भाव मिळाला.
पुणे मार्केट यार्डमधील निशिगंधा फ्लाॅवर्सचे मालक वैभव पाटणे यांनी सांगितले की, कट फ्लाॅवर्सचे भाव देखील गणेशोत्सवानिमित्त वाढले आहेत. गुलाब- 200 ते 250 रुपये गड्डी, तर शेवंती (बंगलुरु) 250 ते 300 रुपये आणि कार्नेशनला 300 ते 250 रुपये गड्डी असा भाव मिळाला. फुलांचे दर वाढल्याने फूल उत्पादक शेतक-यांना याचा फायदा होत असल्याचेही वैभव पाटणे यांनी One India Marathi शी बोलताना सांगितले.
दादर फूल मार्केटमध्ये फूलांना चांगला दर
झेंडू : 50 ते 150
गुलाब : 100 ते 110
गुलछडी : 900 ते 1000
शेवंती : 300 ते 400
जास्वंद : 400 ते 500 शेकडा
दुर्वा जूडी : 30 ते 40
कापरी :100 ते 120
अॅस्टर :180 ते 200












Click it and Unblock the Notifications