महायुतीमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला! गृह अन् महसूल मंत्रालय कोणाला मिळणार, जाणून घ्या
Maharashtra Power-sharing formula: महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या महायुती आघाडी सरकारमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
ज्यामध्ये महाराष्ट्र निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला 22 मंत्रिमंडळ, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 11 आणि 10 मंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे. मात्र, सत्तावाटपाच्या सूत्राला अद्याप भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची मान्यता मिळालेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औपचारिक मंजुरी घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील फडणवीस मंत्रिमंडळातील खात्यांच्या वाटपाबाबत बोलायचे झाले तर, भाजप गृह मंत्रालय आणि महसूल यांसारखी महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवणार आहे.
शिवसेना नगरविकास खात्यावर खुश
शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकासाची धुरा सांभाळण्यास सज्ज आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अर्थखात्याचा कारभार पाहणार आहे. अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर महायुतीतील पक्षांमध्ये खातेवाटप अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होणार आहे, मात्र अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्लीतील भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरी मिळताच मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आयोजित केला जाईल, असे मानले जात आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काहीही अडचण नाही
राष्ट्रवादीच्या नेत्याच्या म्हणण्यानुसार भाजप आणि शिवसेना यांच्यात खातेवाटपाबाबत कोणतेही एकमत झाले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व गोष्टीसाठी तयार आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी विधानसभा अधिवेशनाच्या विधीमंडळाच्या गरजा लक्षात घेऊन मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांच्या जास्तीत जास्त आमदारांचा समावेश करण्यावर भर दिलेला आहे.












Click it and Unblock the Notifications