Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अनिल देशमुख पीएच्या माध्यामातून पैसे घ्यायचे, सचिन वाझेचा गंभीर आरोप

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युध्द सुरू आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत अतिशय गंभीर आरोप करत निशाणा साधला होता. मात्र आता मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी आरोपी सचिन वाझे यांनी एक गौप्यस्फोट करुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

सचिन वाझेंने अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले आहेत. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे असल्याची माहिती सचिन वाझेने दिली आहे. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असे आरोप वाझेने केले आहेत.

Sachin vaze

जे काही घडले, त्याचे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएमार्फत गेले. याचे सीबीआयकडे पुरावे आहेत आणि मी एक लेखी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे सादर केले आहेत.सचिन वाझे हे 2021 च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातही आरोपी आहेत.

100 कोटींच्या खंडणी प्रकरण आणि 2021 च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात सचिन वाझे सचिन वाझे तुरुंगात आहे. मात्र, आता सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांना रुग्णालयात घेऊन जात असताना 'एएनआय'ला बोलताना सचिन वाझे यांनी हे आरोप केले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+