बीड जिल्ह्यातील 'या' माजी आमदारांचा अपघातात मृत्यू, पंकजा मुंडेंना मोठा धक्का, कार्यक्रम रद्द!
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूल वरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे निधन झाले आहे, अपघातानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते. लातूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. खासदार बजरंग सोनवणे यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर दुसरीकडे, मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करुन लातूर गाठले आहे.

नेमकी कशी घडली घटना, वाचा संपूर्ण थरार!
बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या गाडीला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला आहे. या अपघातात माजी आमदार आर. टी. देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Maharashtra: Former MLA R.T. Deshmukh, met with a car accident on the Latur-Tuljapur Road near Belkund. He sustained serious injuries and was immediately admitted to Sahyadri Hospital in Latur, where doctors declared him dead pic.twitter.com/0suT0qTHZO
— IANS (@ians_india) May 26, 2025
गोपिनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते आर.टी. देशमुख
याबाबत माहिती मिळताच भाजप नेत्या तथा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी तत्काळ आपले कार्यक्रम रद्द थेट लातूर गाठले. दरम्यान, आरटी देशमुख हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार बनले होते. ते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून बीड जिल्ह्यात परिचित होते. तसेच गोपिनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांना त्यांनी कायम साथ दिली होती.
मंत्री पंकजा मुंडेंचे सर्व कार्यक्रम रद्द
राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात होत्या. त्यांना या ठिकाणी देशमुख यांच्या निधनाची बातमी कळताच तातडीने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत नांदेडहून लातूरकडे प्रस्थान केले. आर. टी. देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला.
बजरंग सोनवणेंकडून श्रद्धांजली
लातूर जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातात माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय आर. टी. देशमुख (जीजा) यांचे दु:खद निधन झाले. जीजांच्या जाण्याने बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट केली आहे.












Click it and Unblock the Notifications