Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फुटबॉलचा देव मुंबईत: लिओनेल मेस्सीच्या हस्ते 'Project Maha-deva'चे उद्घाटन! पाहा-Video

अर्जेंटिनाला आपल्या नेतृत्वात विश्वचषक जिंकून देणारा, जगभरातील फुटबॉल चाहत्यांचा लाडका सुपरस्टार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, त्याने आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत चाहत्यांची मने जिंकली.

कोलकातातून भारत दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर, मेस्सीचे मुंबईतील क्रिकेटचे माहेरघर असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये रविवारी आगमन झाले आणि त्याचे चाहते व मान्यवरांकडून उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमच्या आत आणि परिसरात फुटबॉल चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

Football Legend Lionel Messi at Wankhede Stadium

क्रिकेटच्या पंढरीत फुटबॉलच्या जादूगाराची एंट्री!

ज्या मैदानावर क्रिकेटचे अनेक विक्रम घडले, त्या वानखेडे स्टेडियममध्ये फुटबॉलचा देव म्हणजेच लिओनेल मेस्सी सायंकाळी 6 वाजता दाखल झाला. मेस्सीच्या एन्ट्रीने चाहत्यांचा जल्लोष शिगेला पोहोचला. चाहत्यांनी 'मेस्सी, मेस्सी' असा जयघोष करत संपूर्ण स्टेडियम दणाणून सोडले. या ऐतिहासिक भेटीदरम्यान, मेस्सीने भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री याची भेट घेतली. दोन्ही स्टार खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या, हा क्षण चाहत्यांसाठी खास ठरला.

मेस्सीच्या हस्ते 'प्रोजेक्ट महादेवा'चा शुभारंभ

मेस्सीच्या स्वागतानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सीला स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. यानंतर, राज्याच्या फुटबॉल विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी 'प्रोजेक्ट महादेवा' चा शुभारंभ मेस्सीच्या हस्ते करण्यात आला.

मेस्सी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी बटण दाबून या प्रोजेक्टचे उद्घाटन केले. यावेळी मेस्सीने 'प्रोजेक्ट महादेवा' अंतर्गत निवडण्यात आलेल्या ६० गुणवंत खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान केली.

या प्रोजेक्टसाठी निवडण्यात आलेल्या १३ वर्षांखालील फुटबॉलपटूंना मेस्सीसोबत फुटबॉलचे विशेष प्रशिक्षण मिळाले, तसेच मेस्सीने त्यांना मौल्यवान मार्गदर्शनही केले.

'प्रोजेक्ट महादेवा' : उद्याच्या फुटबॉलपटूंसाठी ऐतिहासिक संधी

क्रिकेटला अधिक महत्त्व असलेल्या भारतात, फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रासरूट स्तरावर फुटबॉलचा विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून 'प्रोजेक्ट महादेवा' राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या ६० उदयोन्मुख खेळाडूंना फुटबॉलचे तंत्रशुद्ध धडे देण्यात येणार आहेत. या ६० खेळाडूंसाठी मेस्सीसारख्या जागतिक दिग्गजासोबत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणे, ही त्यांच्या कारकिर्दीतील एक ऐतिहासिक संधी आहे.

या प्रकल्पातून उद्याचे गुणवान फुटबॉलपटू घडतील आणि भविष्यात भारताची फुटबॉलमधील कामगिरी नक्कीच सुधारेल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे. लिओनेल मेस्सीच्या या भारत भेटीमुळे भारतीय फुटबॉलला, विशेषत: महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना, मोठी प्रेरणा मिळाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+