तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो.. 'त्या' उमेदवाराबद्दल फडणवीसांची थेट ऑफर

Maharashtra Assembly Election 2024- विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. राज्यभर सगळ्या प्रमुख नेत्यांच्या सभा सुरु आहेत. अशातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका उमेदवाराच्या प्रचारसभेत, थेट मंत्रीपदाची ऑफर देऊन टाकली. तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो.. अशा शब्दांत फडणवीसांनी या प्रचारसभेत उपस्थितांना ऑफर दिल्याने एकच चर्चा सुरु झाली.

Devendra Fadnavis

काय दिली फडणवीसांनी ऑफर

दौंड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांची वरवंड येथे प्रचारसभा झाली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांच्या कामाचं कौतुक केलं. उपस्थितांना संबोधित करताना तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो, अशी थेट ऑफर देवेंद्र फडणवीसांनी दिली. फडणवीस म्हणाले, 23 तारखेला राहुल कुल यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुम्ही गिफ्ट म्हणून त्यांना मतदान द्या. मतांचा नवीन रेकॉर्ड झाला पाहीजे. यावेळी राहुल कुल यांना मंत्री करणार असल्याचं मी ठरवलं आहे. पण माझी अट आहे. त्यांना 20 हजारांपेक्षा कमी मताधिक्याने निवडून दिलं तर राज्यमंत्रिपद आणि 20 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले तर कॅबिनेट मंत्री, असं म्हणत फडणवीसांनी दौंडची सभा गाजवली.

राहुल कूल यांच्या कामाचं कौतूक

फडणवीस म्हणाले, महायुतीचं सरकार आलं की मुळशीचे पाणी या भागाला मिळणार आहे. भीमा पाटस कारखाना अडचणीत होता आता चांगला सुरू झालाय. मोदींनी 10 हजार कोटी रुपयांचा इनकम टॅक्स कमी केला. उसाचे भाजपला काय समजते असं म्हणत होते नाकावर टिचून काम करतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सरकारी योजनांची दिली माहिती

फडणवीस म्हणाले, आम्ही लाडकी बहिण योजना आणली. त्यावेळी अडीच कोटी महिलांकच्या खात्यात पैसे पाठवले. आम्ही सख्खे भाऊ तुमच्यासाठी पैसे देतोय. पण काही सावत्र भाऊ मार्केटमध्ये फिरत आहेत. ते ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. पण आम्ही थांबणार नाही. सरकार आल्यावर 2100 रुपये महिलांना देणार आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. या सभेत राहुल कुल यांनीही विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, कारखाना सुरू झाल्यावर विरोधकांना पोटदुखी सुरु झाली. पण आपण कारखान्याबरोबरच शैक्षणिक संकुल येणाऱ्या काळात उभं करणार आहोत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+