Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एलन मस्क यांच्या टेस्लाचे मुंबईत शोरूम होणार; BKCत भाडे करारही झाला, 20 स्टाफची भरती होणार

Elon Musk and Mumbai News : टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क आता मुंबईत पहिलं शोरूम उघडणार आहेत. यासाठी भाडेकरारावर त्यांनी सही केलीय. हा भाडे करार पाच वर्षांचा असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने यापूर्वी देखील भारतात टेस्लाचे शोरूम उघडण्याचे प्लॅन आखले होते. पण ती योजना रद्द झाली होती.

यानंतर टेस्लाने भारतात आयात केलेल्या कारच्या विक्रीवर फोकस केला होता. मात्र त्यानंतर आता टेस्लाने थेट मुंबईत पहिलं शोरूम उघडण्यासाठी करार केलाय. अद्याप टेस्लाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Elon Musk

भाडेकरारात काय ठरलंय, जागा किती!

भाडेकराराच्या कागदपत्रांनुसार टेस्लाने 16 फेब्रुवारी 2025 पासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी करार केलाय. 16 फेब्रुवारी 2025 पासून हा करार लागू करण्यात आलाय.

पहिल्या वर्षासाठी मस्कने 4 लाख 46 हजार डॉलर्स म्हणजेच 3 कोटी 87 लाख 48 हजार रुपये मोजले आहेत. ही जागा जवळपास 4 हजार चौरस फूट इतकी आहे.

विमानतळाजवळील बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये शोरूम

सीआरई मॅट्रिक्सने रॉयटर्सला दिलेल्या कागदपत्रांनुसार पाच वर्षांनी हे भाडं पाच टक्क्यांनी वाढेल. त्यानुसार टेस्लाला पाच वर्षानंतर 5 लाख 42 हजार डॉलर्स इतकं भाडं द्यावं लागेल. मुंबई विमानतळाजवळ बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये मेकर मॅक्सिटी इमारतीत हे शोरूम आहे.

नवी दिल्ली अन् मुंबईत होणार दोन शोरूम

रॉयटर्सने गेल्या महिन्यात दिलेल्या बातमीनुसार टेस्लाने मुंबई आणि नवी दिल्ली अशी दोन शहरं शोरूमसाठी निवडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिका दौरा केला. या दौऱ्यात टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यानंतर काही दिवसांनीच हा करार झालाय.

20 कर्मचारी भरतीसाठी यादीही जाहीर

अब्जाधीश एलन मस्क यांची कंपनी टेस्लाने भारतात भरतीचे प्रयत्न तीव्र केले आहेत. टेस्लाने महाराष्ट्रात 20 ओपन पोझिशन्सची यादी दिली आहे. त्यापैकी 15 नोकऱ्या मुंबईसाठी आणि 5 रिक्त जागा पुण्यासाठी आहेत. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपनी टेस्लाचे भारतातील नियुक्ती आणि विस्तार प्रयत्न वाढत्या इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेचा फायदा घेण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+