Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लोकसभेत फटका! पण विधानसभेला होणार फायदा शरद पवारांना 'हा' मोठा दिलासा घ्या जाणून

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निर्भेळ यश प्राप्त केले. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांना मतांचा मोठा फटकाही बसला होता. पण निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे शरद पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या निर्णयामुळे त्यांच्या पक्षाचा विधानसभा निवडणुकीतील संभाव्य अडसर दूर झाला असून यामुळे त्यांचा फायदाही होणार आहे. चला तर नेमके काय कारण आहे हे जाणून घेऊया.

Sharad Pawar

लोकसभेत घवघवीत यश

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या. यातील आठ जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळाल्या. कमी जागा घेऊनही हा पक्ष सर्वात यशस्वी ठरला. त्यामुळे शरद पवारांचा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचाही विश्वास दुनावला आहे. पण याच लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठा फटकाही बसला होता. तो काय हे पाहू.

हा बसला होता फटका

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह दिले आहे. या चिन्हावरच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. पण तुतारीसारखेच दिसणारे पिपाणी हे चिन्हही इतर उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे मतदान या पक्षाला पडल्याचे बोलले जाते. नाशिकसह सर्वच जागांवर 4 लाखांहून अधिक मतदान पिपाणीला पडले होते. विशेषतः सातारा लोकसभेत या चिन्हामुळे पवारांच्या उमेदवाराला पराभवाचेही तोंड पहावे लागले होते.

दिंडोरीतही पिपाणीमुळे तुतारीला फटका

दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांच्या पिपाणीला राज्यात सर्वाधिक तब्बल 1 लाख 3 हजार 632 मते मिळाली होती. तर बारामती मतदारसंघात सोयलशाह शेख या उमेदवारानं 14 हजार 917 मतं मिळवली, याचा शरद पवारांच्या पक्षाला फटका बसला.

दिंडोरीत पिपाणीला मोठे मतदान

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले. या मतदारसंघात 37 हजार मते अपक्ष उमेदवाराच्या 'पिपाणी'ला पडली आहेत. शरद पवार गटाने लढवलेल्या 10 लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्हाने तब्बल 4 लाखांपेक्षा जास्त मते मिळवली. त्यामुळे विधानसभेला तुतारीसमोर पिपाणीचा धोका होता.

निवडणूक आयोगाने गोठवले पिपाणी चिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसल्याची भावना व्यक्त करत हे चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या यादीतील पिपाणी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते की, आम्ही भाषणात तुतारी चिन्हाचा प्रचार करत होतो. पण मतदारांमध्ये संभ्रम झाला. आम्ही यासदंर्भात निवडणूक आयोगाकडे मतदानापूर्वी तक्रार केली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे म्हणणे होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+