मोठी बातमी! 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात 5 महिन्यांत 17 हजार 200 कोटी जमा, 48 हजार कोटीची तरतूद
Eknath shinde on MVA : "जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या पाच महिन्यांचे राज्य सरकारने दोन कोटी तीस लाख माझ्या बहिणींच्या खात्यात सतरा हजार दोनशे कोटी रुपये जमा केले आहे, अशी माहिती खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रायगड येथे आज ते लाडकी बहिण वचनपुर्ती सोहळ्यात बोलत होते.
आता आपण बटण दाबले असून उरलेल्या लोकांच्या खात्यात पैसे गेले जे राहतील त्यांनाही पैसे मिळतील ही योजना फसवी असल्याचे विरोधक म्हणतात . आम्ही देणारे आहोत.. घेणारे नाही. आमची देना बँक आहे लेना बँक नाही. हप्ते भरणारे सरकार आहे पुर्वीचे हप्ते घेणारे सरकार होते असेही ते म्हणाले.

पुर्वीचे हप्ते घेणारे सरकार होते
एकनाथ शिंदे म्हणाले, आज जे बटण दाबलं. त्यानुसार,जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या पाच महिन्यांचे दोन कोटी तीस लाख माझ्या बहिणींच्या खात्यात सतरा हजार दोनशे कोटी रुपये जमा केले. आता आपण बटण दाबले असून उरलेल्या लोकांच्या खात्यात पैसे गेले जे राहतील त्यांनाही पैसे मिळतील ही योजना फसवी असल्याचे विरोधक म्हणतात . आम्ही देणारे आहोत.. घेणारे नाही. आमची देना बँक आहे लेना बँक नाही. हप्ते भरणारे सरकार आहे पुर्वीचे हप्ते घेणारे सरकार होते.
आई तगमग करताना मी पाहिलंय..
एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना वचनपुर्ती सोहळ्यात बोलताना आईविषयी भावना व्यक्त केल्या. ही योजना चालु ठेवण्यासाठी काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. त्यानुसार आम्ही काम करत आहोत कारण महिना कसा चालवायचा. आमची आई कशी काटकसर करायची, तिची तगमग मी पाहीली आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ऑक्टोबरसोबतच नोव्हेंबरचाही हप्ता मिळाला! - अजित पवारांची माहिती
आमची निती साफ, देण्याचीच वृत्ती
एकनाथ शिंदे म्हणाले, आचारसंहीता लागेल विरोधक डोळे लावून बसले होते. आचारसंहीता लागली की, कोर्टातून स्टे घेऊन योजना बंद करु यासाठी विरोधक काम करत होते पण या लाडक्या बहिणींच्या योजनेला कुठेतरी आचारसंहीतेची अडचण येऊ नये म्हणून आम्ही ठरवले की, ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे द्यायचे. आम्ही अनामत रक्कम देणारे सरकार आहे. आमची निती साफ आहे. आमची देण्याची वृत्ती आहे.
दिडचे तीन हजार देऊ
एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी योजना सुरु व्हायला हवी हे आमचे ध्येय आहे. आम्ही दीड हजार रुपये देण्यावर नाही थांबणार. तुम्ही ताकद दिली तर माझा शब्द आहे की, दीडचे दोन , दोनचे अडीच हजार अन् आणखी ताकद वाढवली तर तीन हजार करु कारण आम्ही देणारे आहोत. हे सर्व सामान्यांचे पैसे आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे जे पैसे खात्यात येत आहेत आम्ही कुठल्याही स्थितीत बंद होऊ देणार नाही. काही सावत्र भावांपासून सावध करायचे आहे. ते कोर्टात गेले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल, काँग्रेस नेते सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे कोर्टात सांगतात की, लाडकी बहिण योजनेत पैशांचा अपव्यवहार आहे.
हेही वाचा : लाडकी बहिण योजनेचे पैसे अडकलेय? आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का, ते कसं करायचं? घ्या जाणून
15 हजार कोटींची तरतूद - आदिती तटकरे
आदिती तटकरे म्हणाल्या, पाच महिन्यांचा लाभ दोन कोटी तीस लक्ष महिलांपर्यंत यशस्वीरित्या पोहचवले आहे. १५ हजार कोटी रुपये तरतूद आहे. स्वतःच्या खात्यात सन्मान निधी जमा झाल्यानंतर आनंद होतो.












Click it and Unblock the Notifications