मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ऑक्टोबरसोबतच नोव्हेंबरचाही हप्ता मिळाला! - अजित पवारांची माहिती
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत मोठा अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोहेंबरचा हप्ता देण्यात आला आहे. खुद्द अजित पवार यांनीच ही माहिती आपल्या भाषणात दिली. राज्यातील रायगड येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या वचनपुर्ती कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे. आज या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बटन दाबून हप्ता हप्ता वितरित केले आहे.
अजित पवार म्हणाले, यंदाचा अर्थसंकल्प सादर केला त्यात आम्ही लोकांना आवडणाऱ्या योजना आणल्या. त्यातली एक लाडकी बहिण योजना आहे. आता चारही हप्त्याची भेट मिळाली आहे. आम्ही भाऊबीजेची ओवाळणी आम्ही आमच्या मायमाऊलींना दिली आहे. ऑक्टोबर - नोव्हेंबरची ओवळणी दिली आहे.

मुलींना संधी देण्याची गरज
अजित पवार म्हणाले, लाडकी बहिण योजना महिला आणि बालविकास विभागातर्फे चालवली जाते ती धुरा तुमची लाडकी बहिण आदिती तटकरे हिने हा्ती घेतली आहे. ती नव्या पिढीची लोकप्रतिनीधी आहे. ती चोख जबाबदारी पार पाडत आहे. मुलींना संधी देण्याची गरज आहे त्या सोने करुन दाखवतात.
कुणी मायका लाल योजना बंद करु शकत नाही
अजित पवार म्हणाले, काही लोक कोर्टात गेले या लोकांना तुम्ही थारा देऊ नका. कुणी मायका लाल ही योजना बंद पाडू शकत नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला मतं द्या मग पुन्हा पाच वर्ष ही योजना सुरुच राहील. ही योजना बंद होणार नाही. आम्ही वीज माफीची योजना आणली. लाडकी बहिण योजना आणली आम्ही योजनेसाठी जातपात , नातेगोते पाहिले नाही हे सरकार असा विचार करत नाही हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. महिला शेतकरी तरुणांचा विकास करणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही मागे हटणार नाही
अजित पवार म्हणाले, कल्याणकारी विचार आमच्या सरकारचे आहे आम्ही मागे हटणार नाही. पर्यटनाला चालना देत आम्ही पीएम मोदींच्या धोरणांचा फायदा घेऊन महाराष्ट्राला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करु असेही त् म्हणाले. राज्यात मोठी गुंतवणूक व्हावी यासाठी उदय सामंत जोखमीने काम करत आहेत. विमानामध्ये एअऱ होस्टेज जशी ठेवायची तशी बसमध्येही ठेवायची जरुर ठेवा पण चांगले काम आधी करा. आज ही लाडकी बहिण योजनेची शेवटची सभा आहे. आम्ही बोलतो तसे करतो ही ओळख आमची व्हावी ही आमची अपेक्षा आहे. तरुणांसाठी चांगल्या योजना राज्य सरकारने केल्या आहेत असेही ते म्हणाले.
या समाजासाठी संस्था
आम्ही वेगवेगळ्या समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मातंग समाज, आदीवासी, अनुसुचित समाज, मराठा, ओबीसी, आर्थिक मागास समाजासाठी आणि बंजारा समाजासाठी आम्ही संस्था काढली आम्ही अल्पसंख्याक समाज, वडार, सुतार, ब्राम्हण, वीरशैव लिंगायत समाज, विनकर, जैन, तेली, हिंदु खाटीक समाजासाठी भरभरुन देत आहोत. गवळी समाजालाही उद्याच्या मंत्रिमंडळात भरभरुन देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.












Click it and Unblock the Notifications