लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी अपडेट

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : "एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे. ज्या बहिणींनी या भावावर विश्वास टाकला, त्यांना लखपती केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या कागलमधील जाहीर सभेत लाडक्या बहिणींना मोठे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून वाढवून लवकरच 2100 रुपये करणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली.

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana

भावूक सुरुवात : अजितदादांना अभिवादन

कोल्हापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरुवातीला काहीसे भावूक झाले. नुकतेच निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत ते म्हणाले, "अजितदादांच्या जाण्याचे दुःख मोठे आहे. अशा दुःखाच्या प्रसंगातही आम्हाला प्रचाराला यावे लागत आहे, कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात आणि त्या पुढे ढकलता येत नाहीत. आम्ही अत्यंत साधेपणाने प्रचार करत आहोत, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेत आहोत."

"लाडकी बहीण" ठरणार गेमचेंजर

सभेला उपस्थित असलेल्या महिलांच्या प्रतिसादाने भारावून गेलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला "ज्या उमेदवाराच्या मागे महिला शक्ती उभी असते, त्याचा विजय निश्चित असतो. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज तुम्हाला विनंती करायला आला आहे. आम्ही लवकरच ही ओवाळणी 2100 रुपये करणार आहोत," असे शिंदे यांनी जाहीर केले.

लखपती बहीण मिशन: केवळ आर्थिक मदतच नाही, तर विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील महिलांना 'लखपती' करणे हेच सरकारचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या समर्थनार्थ बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "मंडलिक साहेब, तुम्ही एकटे नाही आहात, ही संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. ही लढाई 'जनशक्ती विरुद्ध धनशक्ती' अशी आहे. सत्ता कितीही मोठी असली तरी जनताच ठरवते की कोणाला आशीर्वाद द्यायचा आणि या लढाईत नेहमी जनशक्तीच जिंकते."

कोल्हापुरात शिवसेनेचा दबदबा

शिवसेनेच्या वाढत्या ताकदीचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकीचा आत्मविश्वास व्यक्त केला. नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

कोल्हापूरचा बालेकिल्ला: जिल्ह्यात शिवसेनेचे ५ आमदार आणि १ खासदार आहे. संजय मंडलिक यांचा उल्लेख करत त्यांनी विश्वास व्यक्त केला की, गेल्या वेळची कसर या निवडणुकीत नक्कीच भरून काढली जाईल.

मुख्यमंत्र्यांचे थेट आवाहन

"जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक हा पक्षाचा पाया असतो. मी आज भाषण करायला नाही, तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि तुमच्या प्रेमापोटी इथे आलो आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+