मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची अमित शहांसोबत बैठक, काय झाली चर्चा? वाचा
Eknath Shinde and Devendra Fadnavis meeting with Amit Shah :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर आहेत. त्यांनी रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली. तसेच भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध सरकारी योजनांबाबत लोकांच्या प्रतिक्रियांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, कदाचित मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या वादग्रस्त विधानांवरही चर्चा झाली असावी. त्याचवेळी महाराष्ट्र भाजपच्या बैठकीत अमित शहा यांनी भाजप नेत्यांना सार्वजनिक वाद टाळण्याच्या सूचना केल्या.

शहा म्हणाले की, आपण महाआघाडीत असलो तर संयम बाळगून ऐक्याची प्रतिमा जनतेसमोर येईल याची काळजी घेतली पाहिजे, निवडून येण्याची क्षमता असलेल्या योग्य उमेदवारांची निवड करावी. विरोधकांच्या खोट्या वक्तव्यांना उत्तर देत रहा असेही त्यांनी भाजप नेत्यांना सांगितले.
काही आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही- अमित शहा
भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीत अमित शहा यांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाकडेही लक्ष वेधले. यासोबतच अमित शाह यांनी भाजप नेत्यांना राज्य सरकारने घेतलेले निर्णय आणि योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले. भाजपच्या काही आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही, अशा स्थितीत जागांबाबत योग्य निर्णय घ्या, असे त्यांचे म्हणणे आहे.
लालबागच्या राजाचे घेणार दर्शन
अमित शहा आज सोमवारी सकाळी 10:45 वाजता देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जातील. यानंतर 11.15. च्या सुमारास एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जातील.त्यानंतर दुपारी 12.10 मिनिटांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. यानंतर 12..50 मिनिटांनी अमित शाह हे आशिष शेलार यांच्या वांद्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देतील.
संजय राऊत यांनी दौ-यावरुन केली होती टीका
शिवसेना(उबाठा) नेते संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या मुंबई दौ-यावर टीका केली होती ते म्हणाले, होते की "मणिपूरमध्ये हल्ले होत आहेत. आजही मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत आणि देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन मजा घेत आहेत. मणिपूरला जा किंवा जम्मू-काश्मीरला जा. मुंबईत तुमचे काय काम आहे? दाखवा. मणिपूरला जाण्याचे धाडस करा." असे आव्हानही राऊत यांनी दिले होते.(Eknath Shinde and Devendra Fadnavis meeting with Amit Shah)












Click it and Unblock the Notifications