'गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध', एकनाथ खडसेंचा आरोप; महाजनांनी काढली खडसेंची इज्जत!
Eknath Khadse vs Girish Mahajan : जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अशातच 'गगनभेदी'चे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा दाखला देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नेते एकनाथ खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट व गंभीर आरोप केले आहेत.
या आरोपांमुळे पुन्हा दोन्ही नेते आमनेसामने आले आहे. नेमका काय वाद झाला आणि महाजन-खडसे एकमेकांना काय म्हणाले हे जाणून घेऊया...!

एकनाथ खडसे व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाले?
आपल्या व्हिडिओमध्ये एकनाथ खडसेंनी म्हणाले की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, गिरीश महाजन यांच्या 'रंगल्या रात्री अशा' गिरीश महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंधत आहेत. त्या महिलेचे नाव देखील मला माहिती आहे. मात्र, ते नाव सांगणं उचित होणार नाही.
पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शाहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होते.अमित शाह यांनी गिरीश महाजन यांना सांगितले की, तुझे एका महिला आयएएस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत, परंतु महाजन यांनी त्यांना सांगितले की, नाही माझे कामानिमित्त बरेचसे अधिकाऱ्यांसोबत बोलले सुरू असते.
पण, शाहांनी त्यांना सांगितले की, तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर-शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेले आहेत. तुझे एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध, सीडीआर खरं बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शाहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले आहे", असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
शहांची भेट घेऊन महाजनांबद्दल बोलणार
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, मला वाटते की, खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शाहांना भेटणार आहे आणि अमित शाहा आणि माझी भेट होतच राहते. त्यावेळी मी त्यांना विचारणार आहे की, हे खाली जे चाललं आहे ते काय आहे.
गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर, म्हणाले- मी तोंड उघडले तर
एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाला आता महाजन यांनीसुद्धा जोरदार उत्तरं दिलं असून. मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. एक नंबरचे महाचोर आहेत. कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला.
आपल्यावर झालेल्या आरोपांवर एक तरी पुरावा दाखवावा, सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन असं आव्हानही त्यांनी दिलं. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळ करतील. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही, मला बोलायला लावू नका अशा स्पष्ट शब्दात महाजन यांनी खडसेंना इशारा दिला.












Click it and Unblock the Notifications