Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सुदर्शन घुले, सुधीर सांगळेच्या तपासात धक्कादायक बाबी उघड; कृष्णा आंधळे गुजरातमधून झाला गायब अन्...

संतोष देशमुख हत्या प्रकऱणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, मदत करणारा सिद्धार्थ सोनावणे व डाँ. संभाजी वायभासे यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. आता यांची सध्या एसआयटी पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

Santosh Deshmukh murder case

आरोपी भिवंडीत मुक्कामी

आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर भिवंडीत गेले. तेथे सुदर्शन घुले याचा बालपणीच्या मित्राच्या घरी हे तिघेही राहिले. दोन दिवस त्या मित्राच्या घरीच या तिघांनीही मुक्काम केला. घुले याच्या मित्रानेच या सर्वांची सोय केली. आता या मित्राची चौकशी सध्या करण्यात येत आहे.

भिवंडीतून थेट गुजरात

भिवंडीत दोन दिवस मुक्काम केल्यानंतर हे तिन्ही आरोपी तेथून ११ डिसेंबरला थेट गुजरातला गेले. तेथील प्रसिद्ध गिरनार मंदीरात या तिघांनीही दर्शन घेतले. सुमारे ११ हजार पायऱ्या असलेल्या टेकडीवरील या मंदीरात हे तिघेही थांबले. या मंदीरात या तिघांनीही सुमारे १५ दिवस मुक्काम केल्याचे समोर आले आहे.

गुजरातमधूनच कृष्णा गायब

गिरनार येथील मंदीरात हे तिघेही थांबले होते. मात्र त्यांचे पैसे संपल्यानंतर सुदर्शन घुले याने एका मित्राला फोन करुन पैशाची मागणी केली. त्याच मित्राकडे पैसे आणण्यासाठी सुदर्शनने कृष्णा आंधळे याला पाठवविले. कृष्णा पायऱ्या उतरुन खाली आला मात्र तो पुन्हा मंदीरात आलाच नाही. तो तेथूनच फरार झाल्याचे चौकशीत समोर आले. आता कृष्णा परत न आल्यामुळे सुदर्शन घुले व सुधीर सांगळे हे दोघेही तेथून पुण्याला आले.

पुण्यात बालेवाडीत मुक्काम

पुण्यातील बालेवाडी स्टेडियमच्या बाजूला एका खोलीत ते राहत होते. यावेळी पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला आणि त्या दोघांना पुण्यातून ताब्यात घेतलं. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला बालेवाडीतून अटक करण्यात आली. दरम्यान यात आरोपींना फरार झाल्यानंतर कोणी, कोणी आसरा दिला. कोणी आर्थिक मदत केली, या सगळ्यांची चौकशी होणार आहे. डॉ संभाजी वायबसेना याने देखील पळून जाण्यात मदत केल्याचे आरोप होत आहेत. आता याबद्दलची सर्व माहिती पोलिस तपासातच उघड होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+