Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अगोदर 'त्या' डाँक्टरला पकडले अन् नंतर घुलेसह सांगळे हाती लागले; वाचा नेमके काय झाले...

सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात आज पुण्यात दोन जणांना अटक करण्यात आली. अजूनही कृष्णा आंधळे हा फरार आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली असली तरी, हे दोघे कसे पोलिसांच्या जाळ्यात अडकले हेही मनोरंजक आहे. एका डाँक्टरांच्या माध्यमातून हे पसार झाले होते. व त्याच डाँक्टरांच्या माध्यमातून पोलिसांनी त्यांना पकडले, अशी माहिती मिळत आहे.

Santosh Deshmukh murder case

पुण्यातून दोघांना अटक

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली. तत्पूर्वी ३१ डिसेंबरला वाल्मिक कराड हा पुणे सीआयड पथकाला शरण आला होता. पोलिसांनी पत्रकार परिषद घेतल्यावर या दोन आरोपींना कशी अटक झाली हे समजणार आहे. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी डाँ. संभाजी वायभासे याला अटक केली होती. याच डाँक्टरने या आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

डाँक्टरने केली मदत

सीआयडी पथकाने अत्यंत शिस्तबद्धपणे या प्रकरणाचा उलगडा सुरु ठेवला आहे. सुरुवातीला पोलिसांनी संतोष देशमुख यांचे हत्येच्या दिवशी लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणे याला अटक केली. तो मुंबईत होता. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी डाँ. संभाजी वायभासे याला अटक केली. सुदर्शन घुले व अन्य आरोपींना पळून जाण्याासाठी डाँ. वायभासे यानेच मदत केली होती. याच वायभासेची कसून चौकशी केल्यानंतर आज सुदर्शन घुले व सुधीर सांगळे हे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.

मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याया मिळावा, यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. सरकार तसेच पोलीसांवरील दबाव वाढला आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. विरोधक व काही सत्ताधारी आमदारांनीही ही मागणी लावून धरली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+