हॉटेलच्या वॉशरूममध्ये तरुणींचं ड्रग्ज सेवन; पुण्यातील धक्कादायक व्हिडिओ समोर
पुणे: पुणे ड्रग्ज प्रकरणात सातत्याने नवे अपडेट्स समोर येत आहेत. एल-3 (L-3) या बारमधील ड्रग्ज सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ अलीकडेच समोर आला होता. या प्रकरणी कारवाईचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे आता तरुणींचा वॉशरूममधील ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. पुणे - नगर रस्त्यावरील एका बहुचर्चित मॉलमधील व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे.

काय कारवाई होणार?
अलीकडेच पुण्यातील एफ.सी रोडवरील एल - 3 बार मध्ये पहाटेपर्यंत पार्टी रंगली होती. पार्टीमध्ये काहीजण ड्रग्जचे सेवन करताना दिसून आले. तो व्हिडीओ समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने पसरला. माध्यमांच्या दबावनंतर पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांना अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू असून आता या तरुणींच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात नेमके काय सत्य समोर येईल, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
व्हायरल व्हिडिओ प्रकरणी तपास सुरू: या प्रकरणात आता पोलीस आणि संबंधित विभागाकडून तपासाची चक्रे वेगाने फिरत आहे. व्हायरल व्हिडिओ एका महिलेने चित्रित केला असून हा काही दिवसांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे.
पुण्याला ड्रग्जचा विळखा: ललित पाटील प्रकरणापासून पुणे आणि अंमली पदार्थ हे कनेक्शन सातत्याने समोर येत आहे. पोलिसांनी (Pune police) जिल्ह्यात आणि पुणे शहरात अनेक ठिकाणी कारवाई करूनही ड्रग्जचा पुरवठा थांबलेला दिसत नाही. त्यामुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे.
राजकारण तापलं:
आता पुण्यातील या अंमली पदार्थ प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (shamburaj desai) यांच्यावर विरोधकांकडून हफ्तेखोरी केल्याचे आरोप केले जात आहेत. तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.












Click it and Unblock the Notifications