Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'फडणवीस साहेब..छगन भुजबळांचे ऐकून राज्यातील भाजप संपवू नका': मनोज जरांगे

नांदेड: देवेंद्र फडणवीस यांना आम्ही विरोधक मानत नाही, आधीही मानत नव्हतो, पण आमचे हक्काचे आरक्षण त्यांनी द्यावे, हीच आमची मागणी आहे. छगन भुजबळांचे ऐकून राज्यातील भाजप संपवू नका असा सूचक सल्ला मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा परवापासून सुरु झाला. आज नांदेड शहरात आयोजित सभेत जरांगे पाटील बोलत होते.

manoj jarange warns fadnavis

जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक सल्लावजा इशारा दिला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, तुम्ही छगन भुजबळ यांना बळ देत आहात, आमचे म्हणणे काही नाही पण तुम्ही ओबीसींच्या नेत्यांची टोळी करायला सांगितली असे करु नका. तुम्ही गैरसमज भरुन काढा अन्यथा काहीही करा पण आमचे हक्काचे आरक्षण द्या.

मी मॅनेज होत नाही ही त्यांची पोटदुखी

जरांगे पाटील म्हणाले, जर तुम्ही छगन भुजबळचे ऐकून मराठ्यांना त्रास देणार असाल तर तुमचे २८८ उमेदवार पाडू असा इशाराही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. मी मॅनेज होत नाही ही त्यांची पोटदुखी म्हणून ते बदनाम करतात किंवा संपवण्याचा प्रयत्न करतात.

तुमच्या शब्दाला डाग लागू देणार नाही

जरांगे पाटील म्हणाले, सहा कोटी मराठा माझ्याकडे आशेने आणि अपेक्षेने बघत आहे मी निष्ठावान आहे. असे तुम्ही म्हणता मी तुमच्या शब्दाला डाग लागू देणार नाही. मी मॅनेज होणारा नाही. त्यांनी काहीही दिले असते पण सर्व गोष्टींवर लाथ मारली.

ते मला गावठी, चौथी पास म्हणतात

जरांगे पाटील म्हणाले, समाजाने आपल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहायला शिका. आपल्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला जात आहे. मी शेवटचे सांगतो, मला गावठी, चौथी नापास म्हणून छगन भुजबळ हिनवतात. सरकारने मला प्रोसिडींग बुकवर लिहून दिले की, मराठ्यांच्या 57 लाख नोंदी सापडल्या. माझ्या नादी ते लागले तर त्यांना जनावरांच्या गोळ्या घ्याव्या लागतील असा टोलाही त्यांनी छगन भुजबळ यांना लगावला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+