Doctor sampada munde Suicide : डॉक्टर तरुणी 'त्या' रात्री हॉटेलवर का गेली? हे मोठे कारण आले समोर
Doctor sampada munde Suicide : फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बडणे याच्या शरणागतीनंतर आता दुसरा आरोपी आणि डॉक्टरचा घरमालक असलेल्या प्रशांत बनकर याची भूमिका अधिक स्पष्ट होऊ लागली आहे. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे, तिने हा निर्णय का घेतला याचे मोठे कारण समोर आले आहे.

डॉक्टर हॉटेलवर का गेली? हे आहे कारण
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत बनकर याच्या घरातील वरच्या मजल्यावर पीडित डॉक्टर गेल्या ८ ते १० महिन्यांपासून भाडेकरू म्हणून राहत होती. आत्महत्येच्या आदल्या रात्री डॉक्टर आणि घरमालक प्रशांत बनकर यांच्यात तीव्र वाद झाला होता.
या वादानंतर बनकरने तिला, "तू आमच्या घरात राहायचे नाही आणि इकडे यायचे नाही," असे बजावले होते. याचवेळी तिच्या फ्लॅटला बाहेरून कुलूप लावण्यात आल्याने ऐनवेळी कुठे जायचे, हा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. मानसिक तणावात असलेल्या डॉक्टरने अखेर लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, या काळात तिने पीएसआय गोपाल बडणे आणि प्रशांत बनकर यांना वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.
वाद झाल्यानंतर नेमकं काय झालं? (घटनाक्रम)
पीडित डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात वाद झाल्यानंतर तिला घरात राहण्यास मनाई करण्यात आली.
२३ ऑक्टोबर रोजी पहाटे १:३० वाजता पीडित डॉक्टरने फलटण येथील मधूदीप हॉटेलमध्ये एकटीनेच 'चेक-इन' केले. तिने ही रूम दोन दिवसांसाठी बुक केली होती.
दिवसभरात डॉक्टर, पीएसआय बडणे आणि बनकर यांच्यात अनेक फोन कॉल्स झाल्याची माहिती समोर येत आहे.
अन् आत्महत्या, मृतदेह आढळला
ज्या खोलीत महिला डाॅक्टर थांबली त्या खोलीचा दरवाजा दिवसभर न उघडल्याने हॉटेल व्यवस्थापनाला संशय आला. त्यांनी २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता दरवाजा उघडला असता, डॉक्टरचा मृतदेह आढळून आला, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली.
प्रशांत बनकरच्या कुटुंबीयांचे आरोपांवर स्पष्टीकरण
डॉक्टरच्या मृत्यूनंतर आरोपी प्रशांत बनकरवर गंभीर आरोप होत असतानाच, त्याच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. बनकर कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, "आमचा मुलगा निर्दोष आहे. डॉक्टर तरुणी आमच्याकडे केवळ भाडेकरू म्हणून राहत होती. मुलाला या प्रकरणात विनाकारण गोवले जात आहे. तिच्या आत्महत्येशी आणि इतर आरोपांशी आमचा किंवा आमच्या मुलाचा कोणताही संबंध नाही." अशी बाजू मांडली. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, दोन्ही आरोपींच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications