Diwali 2025 : 2025 मध्ये दिवाळी कधी आहे? जाणून घ्या दिपावलीची तारीख, मुहूर्त आणि लक्ष्मीपूजनाबद्दल
Diwali 2025 : भारतीय सणांच्या परंपरेत दिवाळी हा सर्वात मोठा सण होय. घरापासून कितीही दूर गेले तरीही दिवाळी सण आला की, मुलं बाळं घरी येतात अन् सासुरवाशीन लेकी माहेरी येतातच. हा सण म्हणजे आनंदाचे प्रतिक आहे. लक्ष्मीपुजन, भाऊबीज आणि पाडवा, धनत्रयोदशी आदी पाच दिवस महत्वाचे आहेत.
दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. पाच दिवसांचा दिवाळी सण 2025 मध्ये कधी आहे तारीख काय आहेत हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. पण याशिवाय इतर धर्मीय मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात. कार्तिक महिन्यातील अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये समृद्धी आणि आनंद मिळतो. प्राचीन कथेनुसार, हा दिवस 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येला परतले आणि दिवे लावून भव्य उत्सव साजरा करतात. दिवाळीचा पाच दिवसांचा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेला संपतो.
भारतात दिवाळी 2025 तारीख
2025 या कॅलेंडर वर्षात ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण येणार आहे. 2024 या वर्षात नोव्हेंबरमध्ये दिवाळी आली हेती.नवीन वर्षात 20 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी साजरी केली जाईल. लक्ष्मीपूजनाचा विधी पारंपारिकपणे सूर्यास्तानंतर केला जातो. दिवाळी, ज्याला बऱ्याचदा 'प्रकाशांचा सण' म्हटले जाते, अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे.
दिवाळी 2025 साठी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त:
हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक अमावस्या 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:44 वाजता सुरू होते आणि 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5:54 वाजता संपते.
- लक्ष्मी पूजनाची वेळ: संध्याकाळी 7:08 - रात्री 8:18 (20 ऑक्टोबर)
- प्रदोष काल : संध्याकाळी 5:46 - रात्री 8:18
- वृषभ काल : संध्याकाळी 7:08 - रात्री 9:03
- निशिता काल मुहूर्त: 11:41 PM - 12:31 AM (21 ऑक्टोबर)
पाच दिवसांच्या सणांची तारीख
- धनत्रयोदशी: 17 ऑक्टोबर 2025
- नरक चतुर्दशी: 18 ऑक्टोबर 2025
- दिवाळी: 20 ऑक्टोबर 2025
- कार्तिक अमावस्या : 21 ऑक्टोबर 2025
- गोवर्धन पूजा : 22 ऑक्टोबर 2025
- भाऊबीज : 23 ऑक्टोबर 2025
दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीने सुरु होतो तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते. तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपुजन तर चौथ्या दिवशी पाडवा असतो या दिवशी गोवर्धन पुजाही केली जाते. तर पाचव्या दिवशी भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीजेला बहिण भावाचे औक्षण करते तर भाऊ तिच्या सुरक्षेची जबाबदारी घेत दिला भेटवस्तू देतो.
दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपुजनाला भाविक झेंडूच्या फुलांच्या माळा आणि आंबा, अशोक आणि केळीच्या पानांनी त्यांची घरे आणि दुकाने सजवतात. प्रवेशद्वारावर नारळासह कलश ठेवणे देखील शुभ मानले जाते. स्वच्छता विशेषतः महत्वाची आहे कारण असे मानले जाते की देवी लक्ष्मी फक्त त्या घरांमध्ये प्रवेश करते जे स्वच्छ आणि नीटनेटके असतात. लक्ष्मीपूजनाच्या विधीसाठी, गणपती आणि देवी लक्ष्मीच्या सुंदर सुशोभित मूर्ती ठेवून, लाल कपड्याने पूजेची जागा तयार करा. संध्याकाळी लक्ष्मीपूजनासह दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे.












Click it and Unblock the Notifications