Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अहिल्यानगर हादरले : नर्तिका दिपाली पाटीलच्या आत्महत्येप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक अटकेत

Dipali Patil Suicide Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे एका अत्यंत दुःखद आणि गंभीर घटनेत नर्तिका दिपाली गोकुळ पाटील (वय ३५, रा. कल्याण, सध्या जामखेड) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

जामखेड येथील साई लॉजमध्ये ही घटना घडली असून, दिपालीवर लग्नासाठी सातत्याने जबरदस्तीचा दबाव आणल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपचा माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड याला अटक केली आहे.

Dipali Patil Suicide Case

नेमके काय घडले?

जामखेडमधील तपनेश्वर भागात आपल्या मैत्रिणींसोबत राहणाऱ्या दिपाली पाटीलने शुक्रवारी सकाळी 'बाजारात जाते' असे सांगून घराबाहेर पडली. ती अनेक तास परत न आल्यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिचा शोध सुरू केला. रिक्षाचालकाच्या चौकशीतून ती साई लॉजवर गेल्याची माहिती मिळाली.

सायंकाळी मैत्रिणी लॉजवर पोहोचल्या असता खोली आतून बंद होती. लॉज कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, दिपालीने गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

आत्महत्येमागील कारण आणि भाजप नेत्याला अटक

प्राथमिक पोलीस तपासात, दिपाली पाटीलवर भाजपचा माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड हा लग्नासाठी सातत्याने जबरदस्तीचा दबाव आणत असल्याचे समोर आले आहे. या दबावाला कंटाळूनच दिपालीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संदीप गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली आहे. गायकवाड हा भाजपचा माजी नगरसेवक असल्याने या घटनेला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.

भाजपच्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी घटनेची माहिती नसल्याचे सांगत, पोलीस तपास करतील असे स्पष्ट केले. तसेच, आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडले जाणार नाही, अशी कठोर भूमिका त्यांनी मांडली. त्या म्हणाल्या, "देवाभाऊ कोणाला ही माफी देणार नाही. आमच्या पक्षाचे असले तरी सोडणार नाही."

रोहित पवारांचा गंभीर इशारा आणि मागणी

या दुर्देवी घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीबद्दल यापूर्वीही आवाज उठवला असल्याचे नमूद केले. त्यांनी या आत्महत्येच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे:

आत्महत्या करण्यापूर्वी महिलेसोबत कोण होतं?, त्याचे काय संबंध आहेत?

रोहित पवार यांनी पोलिसांना संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, हे प्रकरण दडपण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+