Dhule City Election :धुळ्यात भाजपकडून अनुप अग्रवाल! महायुती, MVA , 'वंचित', MIM मध्ये रंगणार निवडणूक
Dhule City Assembly Elections 2024 : राज्यात वर्ष 2024 च्या विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली. महायुतीकडून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर दुसरीकडे अनिल गोटे यांनी हाती शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना एबी फार्मही देण्यात आल्याचे सांगण्यात आले असून आता अनिल गोठे विरुद्ध अनुप अग्रवाल अशी भाजप आणि शिवसेना (युबीटी) यांच्यात लढत होणार हे निश्चित झाले आहे.
महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला कोणती जागा सुटणार याची उत्सुकता होती. ती अनिल गोटे यांच्या रुपाने मिळाली आहे. भाजपकडून अनुप अग्रवाल यांना धुूळे शहर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांना आता गोटे यांच्यासह एमआयएमकडून विद्यमान आमदार फारुख शहा यांचेही तगडे आव्हान असेल.

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. वंचित आणि एमआयएम प्रचारालाही लागले आहेत. पण, या ठिकाणी एमआयएम, महायुती आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत अटळ आहे. मतांच्या विभाजनावर विजयाचे गणित ठरणार आहे. त्यासाठी वंचितची भूमिका महत्त्वाची आहे.
गतवेळी काय झाले होते?
वर्ष 2019 च्या निवडणुकीत एमआयएमचे शहा यांनी अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांच्या विरोधात 3307 मतांनी विजय मिळवला. कदमबांडे आता भाजपमध्ये आहेत.
महायुतीमधील घडामोडी
धुळे शहर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा दबदबा असल्याने ही जागा महायुतीत शिंदे गटाला सुटण्याची आशा इच्छुकांना आहे. परंतु, भाजपकडूनही अनेक जण इच्छुक आहेत. ही जागा भाजपला मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
उमेदवारीसाठी भाजपकडून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. माधुरी बाफना, माजी महापौर प्रदीप कर्पे, माजी सभापती शीतल नवले आणि व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हर्षकुमार रेलन हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे युवक शाखेचे जिल्हाध्यक्ष सुमीत पवार यांचे नाव चर्चेत आहे.
महाविकास आघाडीची स्थिती
महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून अद्याप स्पष्टता नव्हती पण आता चित्र स्पष्ट झाले आहे. धुळे शहर मतदारसंघावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दावा केला होता पण ही जागा आता अनिल गोटे यांच्या वाट्याला गेल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख सतीश महाले आणि मनोज मोरे यांच्यात उमेदवारीसाठी चुरस होती.

एआयएमही मैदानात
एमआयएमकडून विद्यमान आमदार फारुक शाह हे उमेदवार असतील, तर मनसेकडून प्राची कुळकर्णी यांचे नाव चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे जितेंद्र शिरसाट यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आले आहे.
या आहेत समस्या
या मतदारसंघात ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, बेरोजगारी या समस्या कायम आहेत. विद्यमान आमदार शाहा यांनी या समस्या काही प्रमाणात सोडविल्याचा दावा केला. परंतु, समस्या कायम असल्याचे विरोध सांगतात.












Click it and Unblock the Notifications