Dhule Accident News : 'ते' कीर्तन ठरले अखेरचे..! धुळ्यात भीषण अपघात 5 जण जागीच ठार
Dhule Accident News :धुळे जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला असून यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतात तीन महिलांचा समावेश असून चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वाहनातील मृत व्यक्ती कीर्तनाहून घरी परतत होते. त्यांच्यासाठी कीर्तन अखेरचे ठरले.
महाराष्ट्रात अपघाताच्या सारख्या घटना घडत असून त्यात अनेकांचे रस्त्यावर जीव जात आहेत. काल-परवा छत्रपती संभाजीनगर आणि भंडारा येथेही अपघाताच्या घटना घडल्या. या घटना ताज्या असतानाच धुळे जिल्ह्यात घडलेल्या अपघातामुळे सुरक्षित वाहतुकीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

कुठे घडला अपघात.?
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण पिकअप व्हॅन आणि ईको वाहनामध्ये अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चेंदामेंदा झाला.मयतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
अखेरचा रामकृष्ण हरी...
वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते. त्यादरम्यान भरधाव पिकपने या वाहनाला धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. दीपक असं या पिकअप वाहन चालकाचे नाव असून तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला या अपघातात किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
भंडाऱ्यातील अपघाताची घटना ताजीच
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देवाडा साखर कारखान्यांवर भीषण अपघात होऊन दोन भावांचा मृत्यू झाला. आई-वडिलांची भेट घेत घरून स्कुटीने निघालेल्या दोन सख्ख्या भावंडांवर काळाने झडप घातली. परवा हा अपघात घडला होता. अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिल्याने या दोन्ही भावंडांचा जागीच मृत्यू झाला होता. प्रज्ज्वल साठवणे आणि निखिल साठवणे(दोन्ही रा. करडी ) अशी मृत भावंडांची नावे आहेत. ही घटना साखर कारखाना व देव्हाडा मार्गावर घडली. या घटनेने करडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगरला भीषण अपघात
संभाजीनगर येथे 14 सप्टेंबर रोजी भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली होती.यात आजी आणि आईसह दीड महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ घडली.(Dhule Accident News)












Click it and Unblock the Notifications