ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा अंत, विसर्जन मिरवणूक निघण्यापूर्वीच धक्कादायक घटना; गावावर शोककळा!

Accident News : राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह सुरू आहे. अशातच एक धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. धुळे शहराजवळ असलेल्या चितोड गावांमध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वीच मोठी दुर्घटना घडली. गावातील एका ट्रॅक्टर खाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आजूबाजूला खेळत होत्या मुली

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या चितोड गावातील या घटनेने मन हेलावून टाकले आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणूक निघण्यापूर्वीच गावात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर टालीच्या भीषण अपघाताच्या घटनेने गावात स्मशान शांतता पसरली आहे. ट्रॅक्टरवर चढून ड्रायव्हरने ट्रॅक्टर सुरू केला, मात्र या ट्रॅक्टरच्या आजुबाजूला असलेल्या तीन चिमुकल्या मुलींच्या अंगावरुन हा ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात घटनेत एक महिला देखील जखमी झालेली आहे.

Accident News

पोलिसांकडून चौकशी सुरू

हा अपघात नेमका कसा झाला, गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्षात कसं आलं नाही, याचा तपास सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस अधिकाऱ्यांनी चितोड गावात धाव घेऊन पाहणी करुन ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. तसेच, ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.

4, 7 अन् 14 वर्षांच्या मृत मुली

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक मुलगी 4 वर्षांची,एक 7 आणि एक 14 वर्षांची, अशा तीन मुली असून एक महिला देखील गंभीररित्या जखमी झाली आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून घटना नेमकं कशी घडली, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश विसर्जनादिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+