Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धाराशीवमध्ये एका मताने फिरवलं नशीब! ठाकरेंचा हा उमेदवार विजयी; राज्यातील टॉप 10 निवडणूक निकाल वाचा

Dharashiv ZP Result : "एक मत काय करू शकतं?" याचं सर्वात जिवंत आणि थरारक उदाहरण आज धाराशीव जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळालं. जिल्ह्यातील ढोकी मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत ठाकरे गटाचे अमर नाना समुद्रे यांनी अवघ्या १ मताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

Dharashiv ZP Result Amar Samudre Wins by 1 Vote

श्वास रोखून धरणारी मतमोजणी!

ढोकी मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत कधी भाजपचे निहाल काझी, तर कधी ठाकरे गटाचे अमर समुद्रे आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत कोणाचाही विजय निश्चित सांगता येत नव्हता. अखेरच्या क्षणी जेव्हा निकाल जाहीर झाला, तेव्हा अमर समुद्रे यांना ३१८७ मतं मिळाली होती, तर निहाल काझी यांना ३१८६ मतं मिळाली. फक्त एका मताने अमर समुद्रे यांनी विजयाचा गुलाल उधळला.

राज्यातील १० मोठे आणि धक्कादायक निकाल

१. धाराशीव (ढोकी): अमर समुद्रे (ठाकरे गट) विरुद्ध निहाल काझी (भाजप) - १ मताने विजय.

२. सोलापूर (माळशिरस): संस्कृती राम सातपुते (भाजप) यांचा विक्रमी विजय; विरोधकांचे डिपॉझिट जप्त.

३. पुणे (बारामती): पल्लवी खेत्रे (अजित पवार गट) यांनी बारामतीचा गड राखला.

४. सोलापूर (माढा): अश्विनी दळवे (अजित पवार गट) यांचा दणदणीत विजय.

५. सोलापूर (सांगोला): आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेने (शिंदे गट) विरोधकांना चारीमुंड्या चित केले.

६. रायगड (अलिबाग): आंबेपूर गटात रसिका केणी (शिंदे गट) विजयी.

७. कोल्हापूर (घुणकी): शुभांगी कुंभार (काँग्रेस) यांनी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव केला.

८. संभाजीनगर (अजिंठा): आयशा बेगम (शिंदे गट) यांनी अजिंठा गटात शिवसेनेचा भगवा फडकवला.

९. लातूर (पानगाव): प्रस्थापितांना धक्का देत मनसे उमेदवाराचा अनपेक्षित विजय.

१०. सिंधुदुर्ग (कणकवली): आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात भाजपची 'क्लीन स्वीप' कडे वाटचाल.

हेही वाचा : ZP Election दुपारी12 पर्यंतच्या कलानुसार BJP सर्वात मोठा पक्ष! अजित दादांच्या NCP ला किती जागा, वाचा

छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निकाल अपडेट्स

छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निकाल : एकूण ९ पंचायत समिती

१)छत्रपती संभाजीनगर एकूण (२०)

  • भाजप : ४
  • शिवसेना : ३
  • शिवसेना UBT: १
  • NCP :
  • MIM : ३
  • काँग्रेस २

२)पैठण तालुका (१८)

  • भाजप : १
  • शिवसेना : ११
  • शिवसेना UBT: २
  • NCP : १

३)गंगापूर तालुका (१८)

  • भाजप : ६
  • शिवसेना : ४
  • शिवसेना UBT: १
  • NCP : २

४)वैजापूर तालुका (१६)

  • भाजप : २
  • शिवसेना : ५
  • शिवसेना UBT: ३
  • NCP : ४
  • NCP SP : १

५)कन्नड तालुका (१६)

भाजप : ४
शिवसेना : ५
शिवसेना UBT: २
NCP : १

६)खुलताबाद तालुका (६)

  • भाजप : ३
  • शिवसेना : २
  • शिवसेना UBT: १
  • NCP :

७)फुलंब्री तालुका (८) :

  • भाजप : ४
  • शिवसेना : २
  • शिवसेना UBT: १
  • NCP :

८)सिल्लोड तालुका (१८)

  • भाजप : ३
  • शिवसेना : ९
  • शिवसेना UBT: २,
  • NCP :

९)सोयगाव तालुका (६) :

  • भाजप : १
  • शिवसेना : ३
  • शिवसेना UBT: १
  • NCP :
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+