'मारो देव बापू सेवालाल', देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांचे नवीन गाणं रिलीज, पाहा-VIDEO
Devendra Fadnavis Wife Amruta Fadnavis New Song : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज झालं आहे.
'मारो देव बापू सेवालाल' हे नवं मराठी गाणं अमृता फडणवीस यांनी गायंल असून या गाण्यात त्यांनी उत्तम प्रकारे अभिनय देखील केले आहे. या गाण्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली हे नवं गाणं रिलीज करण्यात आलेलं आहे.
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या बँकर असण्यासोबतच गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात आणि त्याच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
आता अमृत फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत यु-ट्युब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं 'मारो देव बापू सेवालाल' रिलीज केलं आहे.

'मारो देव बापू सेवालाल' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
अमृता फडणवीस यांच्या 'मारो देव बापू सेवालाल' या गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहेत. तर याचं संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केलं आहे. या गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अमृता फडणवीस बंजारा समाजातील महिलांचा ज्या प्रमाणे पेहराव असतो, त्या पेहरावाचे त्यांनी परिधान केले आहे.












Click it and Unblock the Notifications