थोडी शंका असती, तर कार्यक्रमाला आलो नसतो;निंबाळकरांना अभय, संपदा मुंडे प्रकरणावर फडणवीस थेट बोलले!
Devendra Fadnavis Supports Ranjitsinh Naik Nimbalkar : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी आत्महत्येमुळे राज्यात तीव्र राजकीय वातावरण असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी फलटणमध्ये विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या या 'कृतज्ञता सोहळ्या'मध्ये फडणवीस यांनी विरोधकांना स्पष्ट शब्दांत फटकारले, तसेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खंबीरपणे साथ दिली.

'मित्र' रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उल्लेख करत त्यांना जाहीर पाठिंबा दिला. फडणवीस यांनी निंबाळकर यांचा उल्लेख करताना त्यांना 'आमचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकरजी' असे संबोधले.
फलटणच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, "रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही पुर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत." निंबाळकरांना या वादात गोवण्याचा प्रयत्न होत असताना, मुख्यमंत्र्यांनी दिलेले हे अभय वचन राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरले.
LIVE | फलटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 26, 2025
🕑 दु. १.५६ वा. | २६-१०-२०२५📍सातारा.#Maharashtra #Satara #InfrastructureDevelopment https://t.co/CEFmrLp5is
'मला थोडी जरी शंका असती, तरी आलो नसतो'
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उपस्थितीवरून होत असलेल्या राजकारणावर स्पष्टीकरण दिले. आज मी इथे येऊ नये, यासाठी प्रयत्न झाले," असे फडणवीस यांनी मान्य केले. त्यांनी आपली स्पष्ट नैतिक भूमिका मांडली: "या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. मला थोडी जरी शंका आली असती, तरी मी कार्यक्रमाला आलो नसतो."
तडजोड नाही!
फडणवीस यांनी ठणकावून सांगितले की, अशा संवेदनशील बाबींमध्ये ते 'पक्ष, जात, व्यक्ती आणि राजकारण पाहत नाहीत' आणि जिथे 'लहान भगिनीचा विषय असतो तिकडे मी कोणतीही तडजोड करत नाही.'
'मढ्याच्या टाळूवरचे लोणी' खाण्याचे प्रकार
डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. ते म्हटले की, प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवलं जातं, तशाचप्रकारचा निंदनीय प्रयत्न या प्रकरणात झाला. काहीही कारण नसताना रणजितसिंह निंबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव या प्रकरणात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विरोधक 'मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाण्याचे प्रकार' करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
न्यायाची ग्वाही
"कुठल्याही परिस्थितीत आमच्या या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही," असा निर्णय सरकारने घेतला असल्याचे सांगत, चुकीचे राजकारण सहन करणार नाही आणि 'त्याला उत्तर देणारा मी आहे', असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
आरोपींवर तात्काळ कारवाई
या प्रकरणाच्या तपासाबाबत बोलताना फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचा उल्लेख केला. आत्महत्येचे कारण हातावर लिहून ठेवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली आहे "त्यामधील जवळपास सगळं सत्य बाहेर येत आहे," असेही त्यांनी नमूद केले.
-
देशात गॅसचा 'एवढा' साठा! बुकिंगमध्ये मोठी वाढ; सरकारने 'हे' घेतले महत्त्वाचे निर्णय, उपाय जाणून घ्या -
Papmochani ekadashi 2026 wishes marathi पापमोचनी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश -
विश्वविजेत्या इंडियाचे 'बाप्पा'ला साकडे! सिद्धिविनायकाच्या चरणी T20 वर्ल्डकप ट्रॉफीसह गंभीर-सूर्या! -
अदानी समूहाचा मोठा निर्णय: देशात उभारणार 300 शाळा, 30 रुग्णालये; 60 हजार कोटींची गुंतवणूक -
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल!









Click it and Unblock the Notifications