Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ZP निवडणुकीत महायुतीच्या यशावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले- विरोधकांना....

Devendra Fadnavis reaction on Zilla Parishad Election Results 2026 : महाराष्ट्रातील राजकारणातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल समोर येत असून, यामध्ये महायुतीने (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी - अजित पवार गट) निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

विशेषतः भारतीय जनता पक्षाने २०१७ चा स्वतःचाच विक्रम मोडीत काढत ग्रामीण भागात मुसंडी मारली आहे. या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

Devendra Fadnavis reaction on Zilla Parishad Election Results 2026

भाजपची ऐतिहासिक कामगिरी : २०१७ चा विक्रम मोडीत

निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह भाजप आणि महायुतीच्या यशाचा पाढा वाचला. ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या विकासकामांवर विश्वास दाखवला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, तेथे महायुतीचीच सत्ता येईल हे आता स्पष्ट झाले आहे.

निकालाचे महत्त्वाचे आकडे

भाजपचे वर्चस्व : जवळपास ६० ठिकाणी भाजप क्रमांक एकवर आहे. (छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी आणि सातारा यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.)

जागांमधील वाढ : २०१७ मध्ये जिल्हा परिषदेत भाजपच्या १४१ जागा होत्या, त्या आता २३६ वर पोहोचल्या आहेत.

पंचायत समिती : २०१७ मधील २८४ जागांच्या तुलनेत यंदा भाजपने ४१० जागांचा टप्पा ओलांडला आहे.

दोस्त पक्षांची कामगिरी : पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे, तर रत्नागिरी आणि रायगडमध्ये शिवसेना क्रमांक एकवर आहे.

"१२५ पैकी १०० पेक्षा जास्त पंचायत समित्यांवर महायुतीचा झेंडा फडकेल. हा कल स्पष्ट करतो की, ग्रामीण भागातील जनतेने सरकारचे काम स्वीकारले आहे., असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"विरोधी पक्ष केवळ माध्यमांपुरता मर्यादित"

विरोधकांच्या पराभवावर बोलताना फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पराभवाची कारणे शोधण्याऐवजी दुसऱ्यावर खापर फोडणारे कधीच जिंकू शकत नाहीत. विरोधकांमध्ये लढण्याची जी जिद्द असायला हवी, ती कुठेही दिसत नाही.

प्रवक्त्यांचा उपरोधिक आभार

"रोज सकाळी ९ वाजता महाविकास आघाडीचे प्रवक्ते जे बोलतात, त्याचा उलट आम्हालाच फायदा होतो. लोकांचा त्यांच्यावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे," असा टोला त्यांनी लगावला. जनता केवळ माध्यमांमध्ये दिसणाऱ्या नेत्यांच्या मागे जात नाही, तर जमिनीवर काम करणाऱ्यांना साथ देते, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

शरद पवारांच्या प्रकृतीवर भाष्य

निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवार यांच्या निधनामुळे फडणवीस यांनी स्वतः प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. केवळ व्हिडिओद्वारे त्यांनी आवाहन केले होते. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर फडणवीस यांनी संवेदनशीलतेने प्रतिक्रिया दिली. "गेल्या काही दिवसांतील प्रचंड ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी. आमच्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत आणि ते लवकरच बरे होऊन परततील, असा मला विश्वास आहे," असे ते म्हणाले.

"विकृत मानसिकतेचा निषेध"

कर्नाटकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेचा फडणवीसांनी तीव्र निषेध केला. ही घटना विकृत मानसिकतेचे लक्षण असल्याचे सांगत त्यांनी काही नेत्यांवर टीकाही केली. "कोणी विटंबना केली हे शोधण्यापेक्षा, कोणावर तरी याचे खापर फोडण्याचे राजकारण काही लोक करत आहेत, याचे दुःख वाटते," असे ते म्हणाले. कर्नाटक सरकारने या प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने शोधून कडक शिक्षा करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+