Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! विद्यार्थी स्कुल व्हॅनला सरकारची मंजुरी, सरकार लायसन खुले करणार, चालक-पालकांना दिलासा

Devendra Fadnavis government approves student school vans : खासगी वाहनाने विद्यार्थ्यांची वाहनचालकांसाठी आणि पालकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जाहीर होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. विद्यार्थी सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराचीही संधी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis government approves student school vans


फोटो - एआय

स्कूल व्हॅनचे लायसन खुले करणार!

शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.खास बाब म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. या बाबतची अधिसूचना जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली असे ते म्हणाले.

स्कूल व्हॅनसाठी नवीन निर्णय

  • 12+1 आसनी क्षमतेच्या चारचाकी वाहनांना 'शालेय व्हॅन'चा दर्जा.
  • ही वाहने BS-VI श्रेणीतील असतील आणि त्यात अनेक आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असतील, यामध्ये चालकाचे ओळखपत्र, आपत्कालीनवेळी बाहेर पडण्याची सुविधा, अग्निशमन यंत्रणा, आणि वाहन ट्रॅकिंग प्रणाली असेल.
  • शालेय विद्यार्थ्यांची होत असलेली अवैध वाहतूक रोखणे, अवैध रिक्षा वाहतुकीला पर्याय देणे.

रिक्षाच्या तुलनेत व्हॅनचा पर्याय

स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. चार चाके असल्याने वाहन उलटण्याची शक्यता नगण्य असते. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते.

राज्य सरकार परवाने देणार - प्रताप सरनाईक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीला प्रथम प्राधान्य आहे. सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅनला मंजुरी देण्यात येत आहे. नव्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य सरकारकडून परवाने देण्यात येतील. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

ही आहेत स्कूल व्हॅनमधील वैशिष्ट्ये

जीपीएस
सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन
अग्निशमन अलार्म प्रणाली
दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा
ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर
पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे
स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी
गाडीच्या छतावर शाळेचे नाव

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+