Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जीवे मारण्याची धमकी आलेल्या भाजपच्या आमदार श्वेता महाले कोण आहेत? कशी आहे राजकीय कारकीर्द, वाचा

महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना धमकी देण्याचे सत्र सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याच्या धमकी देणात आली होती. या प्रकरणात दोन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथून अटक केली. हे प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा एका आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे हे प्रकरणही बुलढाणा जिल्ह्यातूनच उघड झाले. चिखलीच्या भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे ही धमकी आली. त्यामुळे पुन्हा एकधा खळबळ उडाली आहे.

Shweta Mahale

नेमकं काय घडलंय?

भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी आज (शुक्रवारी) चिखली पोलिसांत याबाबत तक्रार दिली. या तक्रारीनंतर हे प्रकरण माध्यमांसमोर आलं. आ. महाले यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आलं आहे. या पत्रात अगदीच अश्लील भाषाही वापरण्यात आली आहे. महाले यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत येत पोलिसांना हे पत्र दाखवत गुन्हा दाखल केला. मात्र हे पत्र का व कुणी लिहलं हे अद्याप समोर आलेलं नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

कोण आहेत श्वेता महाले?

श्वेता महाले या भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी चिखली जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद भुषविले आहे. चिखली मतदारसंघात गेल्या १५ वर्षांपासूनचा भाजपच्या विजयाचा दुष्काळ श्वेता महाले यांनी संपवला. त्यापूर्वी त्यांनी सभापती म्हणून विकासकामे केली होती. याच जोरावर त्या पहिल्याच प्रयत्नात चिखलीच्या आमदार झाल्या होत्या.

आमदारकीची दुसरी टर्म

आ. श्वेता महाले यांनी गेल्या दोन टर्मपासून चिखलीचे आमदार म्हणून चांगले काम केल्याचे सांगितले जाते. त्यांचे पती हे प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांच्या सासरी व माहेरी अशा दोन्हींकडे राजकीय पाश्वभूमी आहे. राजकारणाचे बाळकडू त्यांना आपल्या घरातूनच मिळाल्याचे सांगितले जाते. भाजपचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर हे त्यांचे राजकीय गुरु असल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषदेत चांगले काम केल्यानंतर 2019 मध्ये त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाले व त्या विजयी झाल्या.

दोन टर्म आमदाराचा पराभव

चिखली मतदारसंघात श्वेता महाले या प्रथम 2019 मध्ये निवडून आल्या होत्या. त्यांनी त्यावेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांचा पराभव केला होता. बोंद्रे हे सलग दोन वेळा चिखली मतदारसंघाचे आमदार होते. त्या लढतीत महाले या 6 हजार 851 मतांनी विजयी झाल्या होत्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+