Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बापरे! पुण्यात नदीत सापडला तरुणीचा हात पाय डोकं नसलेला मृतदेह! खुनाचा संशय, पोलिसांकडून तपास सुरु

pune young girl murder case : पुणे शहरातील मुळा मुठा नदीपात्रात खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शन मागे वाॅटर फ्रंट साेसायटीजवळ नदीपात्रात वाहून आलेला एका तरुणीचा मृतदेह मिळून आला. या घटनेने यापरिसरात एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे या तरुणीच्या शरीरापासून हात, पाय आणि डोके वेगळे केलेले आढळून आले आहे.

ही घना आज उघडकीस आली आहे. राज्यात महिला अत्याचारात वाढ होत असून बदलापूर येथील घटनेनंतर आता पुन्हा या नवीन घटनेने महिला सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह लावले आहे.

pune young girl murder case

18 ते 30 वयोगटातील मृतदेह

सदर तरुणी वाहून आलेली असून तिचा खून झाल्याचा संशय आहे. या तरुणीचे वय 18 ते 30 असून डोके, हात, पाय नाहीत. मुळातः अज्ञात आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने धारदार हत्याराने तिचा खून केला असावा आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीपात्रात फेकून दिला असावा असा कयास आहे. घटनास्थळी पोलिस पोहचले असून या प्रकरणी तपास केला जात आहे.

घटनास्थळी चंदननगर पोलिसांनी पाहणी केली व तरुणीचा मृतदेह ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच या परिसरात पोलिस चौकशी आणि काहीजणांकडून घटनेसंदर्भात माहिती घेत आहेत.

बदलापूर येथील घटना ताजी असतानाच राज्यात अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने राज्यातील वातावरण तणावाचे होत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा देखील सतर्क झाली असून तातडीने अशा प्रकरणाची देखील घेत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील या घटनेची देखील चर्चा राज्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांकडून सदर महिलेची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत असून आरोपींचा शोध देखील सुरु करण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदीत दुथडी भरुन वाहत आहे. परंतु पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील पाण्याचा विर्सग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होऊ लागल्यानंतर खराडी भागात बांधकाम ठिकाणावर काम करत असलेल्या काही मजुरांना नदीपात्रात एक संशयास्पद मृतदेह दिसून आला.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मृत महिला अज्ञात ठिकाणी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन जीवे ठार मारुन तिचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या शरीराचे धडापासून शिर, दोन्ही हात खांद्या पासून, दोन्ही पाय खुब्यापासून कोणत्यातरी धारदार हत्याराने कापले. धड मुळा मुठा नदीपात्रात टाकून दिले असून ते टाकुन दिलेले धड जेनी लाईट कन्सट्रक्शनचे मागे मुळा मुठा नदीत मिळून आले आहे. सदर महिला रंगाने सावळी असून तिच्या उजव्या काखेच्या खाली काळा व्रण आहे, अशी माहिती चंदननगर पोलिसांनी दिली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+