Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती, वादझाल्यानंतर फडणवीसांची घोषणा

नागूपर : नागपूरच्या दीक्षाभूमीतील अंडरग्राउंड पार्किंगच्या बांधकामाची अनुयायी यांनी तोडफोड करत याला विरोध दर्शवला. या भूमिगत पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या स्तुपाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे,असा दावा आंदोलकांनी केला आहे. दरम्यान पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकामाला स्थगिती देत असल्याची घोषणा विधानसभेत केली.

Dikshabhumi Nagpur

आज दीक्षाभूमी परिसरात सुरू असलेल्या भूमिगत पार्किंगच्या कामाला विरोध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमी परिसरात जमा झाले होते. त्यांनी आक्रमकपणे आंदोलन करत बांधकामाची तोडफोड केली. पार्किंगच्या कामाला वाढता विरोध पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या कामाला स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा केली.

दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दीक्षा भूमी परिसरात जे पार्किंगचे काम केले जात आहे, त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडास्मारक समितीने तयार करण्यात आहे. त्यासाठी राज्य सरकारने केवळ निधी पुरवला आहे. या कामासाठी 200 कोटी रुपये दिले. स्मारक समितीच्या आराखड्याप्रमाणे भूमिगत पार्किंगचे काम हाती घेण्यात आले. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+