उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेत मोठी वाढ, पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तूळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती आहे. याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून पोलीस प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकच्या दिंडोरी येथून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरूवात झाली. या यात्रेच्या माध्यमातून ते राज्यभर दौराही करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या जिवाला धोका असून मालेगाव दौऱ्यादरम्यान त्यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. अजित पवार आज (12 ऑगस्ट) मालेगाव, धुळे दौरा करणार आहेत. गुप्तचर यंत्रणांनी मालेगाव, धुळे शहरातील काही संघटनांकडून धोकादायक हालचाली सुरू असून अजित पवारांच्या मालेगाव दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Dcm Ajit Pawar

अजित पवार मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेणार आहेत. आसिफ शेख मालेगाव मध्यमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) पासून दूर गेल्याने मोठा फटका बसला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीसाठी अल्पसंख्याक समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न आजच्या दौऱ्यात असणार आहे. आसिफ शेख यांच्या भेटीनंतर आज अजित पवार धुळे आणि अमळनेरच्या दौऱ्यावर असणार आहेत.

माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर अजित पवार त्यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. आसिफ शेख यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्या भेटीला महत्व आलं आहे. आसिफ शेख हे मालेगाव मध्य मधून उमेदवारी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी आमदार आसिफ शेख यांच्या घरी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+