Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह..! काय आहे, महिलांच्या सुरक्षेचं 'शक्ति अभियान'..? वाचा संपूर्ण माहिती

पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कायदा व सुव्यवस्था चोख ठेवायला सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दर आठवड्याला कोणती ना कोणती घटना, सरकारला कोंडीत पकडत आहे. त्यानंतर विरोधकही सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरू करणार असल्याचे जाहीर केले.

नेमकी काय आहे, सरकारची योजना?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर बारामतीतून मोठी घोषणा केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मधल्या काळात महाराष्ट्रात अतिशय दुर्दैवी घटना घडल्या. मात्र यापुढे अशा घटना घडणार नाहीत. त्यासाठी सरकारनेही तातडीने पावलं उचलली असून 'शक्ति अभियान' सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये पंचशक्ती आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. या अभियानाबाबत अधिक माहिती देताना पवार म्हणाले की, त्यात शक्ति बॉक्स अशी एक तक्रार पेटी असेल.

Dcm Ajit Pawr press conference

मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड, निनावी फोन कॉल, असा त्रास काही महिलांना, मुलींना होतो. मात्र त्याबाबत मनमोकळेपणे बोलता येत नाही . तक्रार करण्यास भीती वाटते. त्यांनी आपली तक्रार मांडावी यासाठी परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल , एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्यूशन , महिला वसतीगृह, पोस्ट ऑफीस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ति बॉक्स - ही तक्रार पेटी ठेवण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. दोन दिवसांत पोलिसांमार्फत सदर तक्रार पेटी उघडून, त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. संबंधितांचे नावही अतिशय गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह

शक्ति बॉक्स या तक्रार पेटीप्रमाणे एक शक्ति नंबरही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितले. 'एक क़ॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ' या अंतर्गत 9209394917 या नंबरवर कॉल करता येईल. या क्रमाकांची सेवा 24 तास सुरू राहणार आहे. त्यावर फोन करून अथवा मेसेज करून तक्रार केल्यास त्या तक्रारीचं त्वरित निवारण करून, त्यावर योग्य ती कारवाई करण्याची दक्षता घेण्यात येईल, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्या तक्रार करणाऱ्या व्यक्तींची ओळख, नावंही गोपनीय ठेवण्यात येतील. हा नंबर बारामतीमधील शाळा, कॉलेज, सरकारी व खाजगी संस्था , कंपनी, हॉस्पिटल येथे लावून आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+