Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Datta Jayanti 2025:आज दत्त जयंती, भगवान दत्तात्रेयांची पूजा विधी, शुभ मुहूर्त अन् महत्त्व जाणून घ्या

Datta Jayanti 2025 Shubh Muhurat Puja Vidhi & Significance : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांची जयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. या दिवशी त्यांची पूजा-अर्चा केल्यास त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) या तिन्ही देवतांची आराधना केल्यासारखे फल प्राप्त होते. आज, ४ डिसेंबर, गुरुवार रोजी दत्त जयंती साजरी होत आहे.

Datta Jayanti 2025 Shubh Muhurat Puja Vidhi

भगवान दत्तात्रेय कोण आहेत? (दत्त कथा)

भगवान दत्तात्रेय हे ऋषी अत्री आणि देवी अनुसूया यांचे पुत्र होते. त्यांची कथा हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव) या तिन्ही देवांचे संयुक्त स्वरूप किंवा अवतार आहेत. या तिन्ही देवतांची शक्ती त्यांच्यामध्ये सामावलेली आहे. भगवान दत्तात्रेय हे भक्तांच्या केवळ स्मरणानेही प्रसन्न होतात आणि त्यांच्या मदतीसाठी धावून येतात अशी धारणा भक्तांमध्ये आहे, म्हणून त्यांना 'स्मृतीगामी' असेही म्हटले जाते.

दत्तगुरूंची पूजा केल्याने तिन्ही देवतांचा विशेष आशीर्वाद मिळतो. यामुळे ज्ञान, समृद्धी आणि शांतता लाभते व जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी धारणा आणि श्रद्धा भक्त ठेवतात.

दत्त जयंती २०२५ शुभ मुहूर्त (४ डिसेंबर, गुरुवार)

मार्गशीर्ष पौर्णिमेची तिथी ४ डिसेंबर रोजी सकाळी ०८ वाजून ३७ मिनिटांनी सुरू झाली असून, ती ५ डिसेंबर रोजी सकाळी ०४ वाजून ४३ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे आज, ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होत आहे.

भगवान दत्तात्रेयांची पूजा विधी

१. स्नान आणि संकल्प: पूजेपूर्वी पहाटे उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. त्यानंतर हात जोडून दत्त जयंतीच्या पूजेचा संकल्प करावा.

२. स्थापना: एका स्वच्छ पाटावर किंवा आसनावर भगवान दत्तात्रेय यांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करावी.

३. पंचोपचार पूजा: मूर्तीला गंध, अक्षता, फुले, धूप आणि दीप अर्पण करून त्यांची पंचोपचार पूजा करावी.

४. नैवेद्य: गोड पदार्थांचा किंवा सात्त्विक फळांचा नैवेद्य दाखवावा.

५. आरती व जप: 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या मंत्राचा किंवा दत्तगुरूंच्या स्तोत्राचा जप करावा. शेवटी मनोभावे त्यांची आरती करावी.

६. दानधर्म: या शुभदिनी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. गरीब आणि गरजूंना वस्त्र, अन्न किंवा दक्षिणा दान करावी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+