Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वय सतरा अन् झाला खतरा! इन्स्टावर ओळख अन् लैंगिक संबंध; गर्भपातासाठी मुंबईतून पाठवल्या गोळ्या!

Crime News : सोशल मिडियाच्या आहारी गेलेले तरुण-तरुणी काय करतीन नेम नाही, पण सोळावं वर्ष सरल्यानंतर सतराव्या वर्षीच हे मुलं नको त्या गोष्टी करत असतील तर ही गंभीर बाब आहे. नको त्या वयात केलेल्या गोष्टी किती गंभीर असू शकतात याचे उदाहरण समोर आले आहे. गुजरातमधील सुरतच्या एका मुलाचे एका मुलीशी सुत जुळले अन् प्रकरण लैंगिक संबंधापर्यंत पोहचले.

Crime News

या प्रकरणी पोलिसांनी एका 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलाने इन्स्टाग्रामवर 16 वर्षीय मुलीशी मैत्री करून संबंध प्रस्थापित केल्यानंतर संबंधित मुलगी गर्भवती झाली. यानंतर तिचा गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकून देण्यात आले होते. पक्षी घिरट्या घालू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मुलीची इन्स्टाग्रामवर एका 17 वर्षीय मुलाशी मैत्री झाली होती. मुलगा सुरतच्या पांडेसरा येथे भाड्याच्या घरात राहत होता आणि त्यांच्यात शारीरिक संबंध होते, त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या गरोदरपणाची माहिती मिळताच मुलगा उत्तर प्रदेश आणि नंतर मुंबईला पळून गेला. पोलिस अधिकाऱ्याने मुलीच्या हवाल्याने सांगितले की, मुंबईतील मुलाने तिला गर्भधारणा संपवण्यासाठी गोळ्यांचे पॅकेट पाठवले. तिने दोन गोळ्या घेतल्या आणि घरीच गर्भपात केला. नंतर गर्भ फेकून दिला.

मुलीने गर्भ नाल्यात फेकून दिला

प्रेमाच्या नावाखाली शरीरसंबंध जर होत असतील तर प्रेमालाही बदनामी सहन करावी लागते, केवळ आकर्षणापोटी घडलेले असे हे प्रकरण.. मुलीचे शरीरसंबंध मुलाशी आल्यानंतर ती गर्भवती राहिली. काही काळाने मुलाने तिला चक्क गर्भपातासाठी मुंबईहून गोळ्या दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर मुलीचा घरीच गर्भपात झाला. मुलीने गर्भ नाल्याजवळ फेकून दिला. यानंतर या गोष्टीचा खुलासाही झाला.

अशी उघडकीस आली घटना

9 जानेवारी रोजी अपेक्षा नगर परिसरात काही मुले खेळत होती. तेवढ्यात त्यांची नजर नाल्याजवळ घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांवर पडली. मुलांनी दगडफेक केली. जवळ जाऊन पाहिले तर एक गर्भ पडलेला दिसला. मुलांनी आवाज केला आणि याची माहिती पालकांना दिली दरम्यान, पोलिस घटनास्थळी आले आणि हा गर्भ एका मुलीचा होता, तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

वैद्यकीय तपासणीत गर्भधारणा स्पष्ट

झोन 4 चे डीसीपी विजय सिंह गुर्जर म्हणाले, गर्भ सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर पोलिसांना संशय आला. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याची पुष्टी केली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासाअंती असे आढळून आले की मुलगी 16 वर्षांची होती आणि ती 3 जानेवारीपर्यंत शाळेत गेली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+