शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कापूस, सोयाबीनचं अनुदान बँक खात्यात टाकायला सुरुवात, 2399 कोटींचे वाटप
Cotton, soybean subsidies Distribution to farmers started : राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023 च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ झाला असून यासंदर्भातील निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टर च्या मर्यादेत प्रत्येकी 5 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे.
पहिल्या टप्प्यात 49 लाख 50 हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये 2398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे 96 लाख 787 इतकी आहे.
त्यापैकी 68 लाख 6 हजार 923 खात्यांची माहिती पोर्टलवर भरली गेली आहे. यात नमो शेतकरी महासन्मान च्या माहिती सोबत आधार जुळणी व 70 टक्के पर्यंत नावाची पडताळणी झालेली संख्या 41 लाख 50 हजार 696 इतकी आहे. तर आधार जुळणी व 69 टक्क्यांहून माहितीची पडताळणी झालेल्यांची संख्या 4 लाख 60 हजार 730 इतकी आहे.
याव्यतिरिक्त आधारसंमतीपत्रानुसार माहिती भरलेल्या खात्यांची संख्या 17 लाख 53 हजार 130 इतकी आहे.
अशारीतीने 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या 63 लाख 64 हजार खात्यांवर अनुदानचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्यासाठी 2 हजार 398 कोटी 93 लाख रुपयांची तरतूद लागणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
राज्यात यंदा अवकाळी पावसाने कहर केला होता. सर्वत्र शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते खासकरुन विदर्भात शेतकऱ्यांना मोठी झळही बसली होती. हे असतानाच शेतकरी अनुदान कधी येणार याची शेतकरी वाट पाहात होता पण आज शासनाने शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
या निर्णयाची अमलबजावणी काही वेळात करुन कापूस, सोयाबीनचं अनुदान बँक खात्यात टाकायला सुरुवातही सरकारने केली आहे. या पार्श्वभुमीावर 2 हजार 399 कोटींचे वाटप केले जात असून यामुळे शेतकरी राजाला मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना अनुदानाची ही रक्कम ऐन दसऱ्याच्या तोंडावर मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी राजाची दिवाळीही चांगली जाणार आहे.












Click it and Unblock the Notifications